कोल्हापूर : ३०. ०१. २०२०
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८ -१९ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये पुणे विभागात ग्रामपंचायत श्रुंगारवाडी, ता. आजरा या ग्राम पंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. याबाबत ग्रामपंचायत श्रुंगारवाडी यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
या विभागस्तरीय स्पर्धेस पुणे विभागातील सर्व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीद्वारे तपासणी करणेत आली होती. आजरा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव असून सुद्धा स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये या गावाने केलेल्या भरीव कामगिरीमुळे श्रुंगारवाडी ग्रामपंचायतीस हे यश प्राप्त झाले आहे. श्रृंगारवाडी गावामध्ये 100 % कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध आहे. तसेच गावामध्ये भुयारी गटर्स असून हे गावं प्लास्टीक मुक्त असून गावातील प्लास्टीक कचरा ग्राम पंचायत स्तरावर संकलित करून तो विक्री केला जातो. या वैशिष्टयामुळे गावाला स्वच्छतेमधील पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या गावांला मा. श्री. बजरंग पाटील, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा.श्री. सतीश पाटील, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर तसेच सर्व सन्माननिय जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व मा. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले