विशेष घटक योजना
- अनुसुचित जाती उपयोजना लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे.
- अनुसुचित जाती उपयोजना लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर (दहा शेळया व एक बोकड) शेळीचा गट वाटप करणे
- विशेष घटक योजना अनुसुचित जाती /नवबौध्द लाभार्थींना ३ दिवसाचे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
- अनुसुचित जातीच्या लाभधारकाकडील शेळया-मेंढया व कोंबडयांना जंतुनाशके पाजणे,क्षारमिश्रणे पुरविणे व परजिवी किटकांचे नियत्रंण करण्यासाठी उपाययोजना करणे.
विशेष घटक योजना २ दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना
अनुसुचीत जाती /नवबौध्द लाभार्थीना शेळी गट वाटप योजना
स्वंरोजगार प्रशिक्षण योजना
प्रशिक्षण फि अमागासवर्गीय रू. २००/- व दारिद्रय रेषेखालील व मागासवर्गीयांना रू. १००/- आकारून बेरोजगारांना स्वंयरोजगार प्रशिक्षण.खात्याच्या विविध तज्ञामार्फत ७ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते लाभार्थीना मा. आयुक्त, पशुसंवर्धन यांचेमार्फत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. त्याचा बँक प्रकरणी विचार केला जातो. दुग्धव्यवसाय/शेळीपालन/वराहपालन/कुक्कुटपालन , वैरण व खादय इ. विषयाचे स्वंतत्र प्रशिक्षण गावपातळीवर प्रशिक्षणाची सोय
शेतकरी प्रशिक्षण शिबिरे
विशेष घटक योजना २ दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना
अनु. जाती व नवबौध्द लाभार्थींना दुभत्या जनावरांचे गटवाटप (२ गायी किंवा २ म्हैशी) ७५ टक्के अनुदान (खरेदी विमा याकरिता) एकुण जास्तीत जास्त अनुदान रु. ६३,७९६/- (खरेदी व विमा या करीता.)
ठाणबंद पध्दतीने शेळी पालनाव्दारे शेतक-यांना पुरक उत्पन्न उपलब्ध करुन देणे.
या योजनेतंर्गत १० शेळया व १ बोकड या प्रमाणे शेळी गट सर्व साधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदानावर व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते या योजनेच्या प्रकल्पासाठी उस्मानाबादी व संगमनेरी जातीच्या शेळयासाठी ८७८६७/- रु व स्थानिक जातीच्या शेळयासाठी रु. ६४८८८/- याप्रमाणे किंमत राहील.
कंत्राटी पध्दतीने मांसल पक्षाचे संगोपन करणे योजना.
या योजनेअंतर्गत १००० मांसल पक्ष्याच्या संगोपनासाठी शेड बांधकामास सर्वसाधारण गटासाठी ५०% अनुदान व अनुसूचित लाभार्थी साठी ७५% अनुदान दिले .उर्वरीत रक्कम लाभार्थींने बॅक कर्जाव्दारे उभा करणेची आहे.