कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राजर्षि शाहू महाराज यांची 143 वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करणेत आली. याच बरोबर आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करणेत आला. या कार्यक्रमानिमित्त्य जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमाले अंतर्गत प्राध्यापक मधुकर पाटील यांनी लोककल्याणकारी राजा शाहू राजा या विषयांवर बोलताना राजांचे खरे संदर्भ जगापुढे मांडून योजनेबरोबर कृतीला जोड देणारा राजा शाहू राजा समजावून घेवून त्याचा वारसा पुढे चालू ठेवावा याबाबत विविध दृष्टांतांतून शाहूंची महती सर्वांसमोर मांडली.
तसेच, आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्य जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. प्रदिप भोगले यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यसनाधिनते विषयी प्रबोधन करणारी ध्वनीफित दाखवून व्यसनमुक्ती ची शपथ दिली.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी शाहूंचे विचार व व्यसनमुक्ती या विषयी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सदरü कार्यक्रमांस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अमरिषसिंह घाटगे, समाजकल्याण सभापती श्री. विशांत महापुरे, तसेच गटनेते श्री. अरुणराव इंगवले, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उप मुख्य कार्यकारी (सा.प्र.) श्री. चंद्रकांत वाघमारे व सर्व विभागांचे खाते प्रमुख व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यÖ कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)
जिल्हा परिषद, कोल्हापूर