जिल्हा परिषद, कोल्हापूर
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रशिक्षण
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) पुणे व सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावरील अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे प्रशिक्षण दिनांक 19/04/2017 ते 20/04/2017 अखेर प्रशिक्षण स्व.वसंतराव नाईक समिती सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. इंद्रजित देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी माहितीचा अधिकार प्रशिक्षण हे फक्त प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून न पाहता प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग सामान्य जनतेस वेळेत माहिती देणेस करावा या प्रसंगी यशदा मार्फत आलेल्या व्याख्यात्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर चे संकेतस्थळावर माहितीचा अधिकार नियम 3 व 4 नूसार दयावी लागणारी माहिती इतर कार्यालयाचे मानाने अद्यावत असलेचे नमुद करुन अभिनंदनास पात्र असलेचे उद्गार काढले.
सदर उद्घाटन प्रसंगी श्री. चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. संजय अवघडे, कक्ष अधिकारी हे उपस्थित होते श्री. दतात्रय केळकर, अधीक्षक यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.