पल्स पोलीओ मोहीम ११ मार्च २०१८ करिता आरोग्य विभाग सज्ज

पल्स पोलीओ मोहिम 11  मार्च 2018 करीता आरोग्य विभाग सज्ज

पल्स पोलीओ मोहिम दि.11 मार्च 2018 यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीेने दि.8 मार्च 2018 रोजी जिल्हा समन्वय समितीची सभा मा.श्री नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेमध्ये पल्स पोलीओ मोहिम यशस्वीरित्या राबविणेसाठी करणेत आलेली उपाययोजना यावर सविस्तर चर्चा   झाली 0 ते 5 वयोगटातील जिल्हयातील 335489 बालकांना पोलीओ डोस देण्यात येणार आहे. मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर व डॉ. उषादेवी कुंभार, जि.आ.अ.  यांचे मागदर्शनाखाली मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याकरीता ग्रामीण भागासाठी 1630 नागरी भागासाठी 198 व कोमनपा साठी 173 असे एकुण जिल्हयामध्ये 2001 पोलीओ बुथची स्थापना करणेत आलेली आहे.  बुथवर डोस चुकलेल्या व प्रवासामध्ये असलेल्या बालकांसाठी एस टी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोल नाके या ठिकाणी 314 ट्रान्झीट टिमची व उसतोड मजुर वस्ती विट भटटी, स्टोन क्रशर, बांधकाम साईट, भटक्या वसाहतीसाठी 669 मोबाईल टिमची स्थापना करणेत आलेली आहे.

दि. 11 मार्च 18 च्या पोलीओ लसीकरणानंतर जर काही बालके लसीपासुन वंचीत राहिलेली असतील त्यांचेसाठी घरोघर सर्व्हेक्षण करुन त्यांना पोलीओ लस पाजणेसाठी जिल्हयामध्ये एकुण 2427 टिम तयार करणेत आलेल्या आहेत अशा टिम 3 -4 दिवस घरोघरी जाऊन डोस चुकलेल्या बालकांचा शोध घेऊन पोलीओ डोस पाजणार आहेत. मोहिम यशस्वीपणे राबविणेसाठी जिल्हयात 7703 कर्मचारी नियुक्त करणेत आलेले असुन 1188 पर्यवेक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत.

सदर मोहिमेसाठी 426000 पोलीओची लस जिल्हयासाठी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक तालुक्यास त्यांचे मागणीनुसार पुरवठा करणेत येत आहे. मोहिम काळात जादा वाहनांची आवश्यकता असलेने मा.जिल्हाधिकारी यांचेमार्फत वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच मोहिमेच्या व्यापक प्रसिध्दीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय करमणुक विभागामार्फत केबल टिव्ही, सिनेमागृह याद्वारे प्रसिध्द करणेत येणार आहे.

पल्स पोलीओ समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, आपल्या घरातील व परिसरातील 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

सदर सभेस डॉ एल एस पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल , डॉ अरुन वाडेकर, आरोग्य अधिकारी कोमनपा, सहायक आयुक्त समाजकल्याण, प्रादेशीक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) हे उपस्थित होते. डॉ एफ ए देसाई जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आभार मानले.

 

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर