दिव्यांग बालकांसाठी मोफत साहित्य साधने वाटप व शिष्यवृत्ती गुणत्ताधारक विद्यार्थी सत्कार समारंभ

केंद्रशासनाच्यासर्वशिक्षाअभियानकार्यक्रमांतर्गतसमावेशितशिक्षणउपक्रमांतर्गतदिव्यांगविद्यार्थ्यांनाअनेकसुविधामोफतपुरविणेतयेतात.विशेषगरजाधिष्ठीतअसणायामतिमंद,बहुविकलांग,सेरेब्रलपाल्सी,अस्थिव्यंग,कर्णबधिरवअंधअसलेल्याविद्यार्थ्यांनासुलभपणेवर्गातबसतायेईल,शालेयपरिसरातवदैनंदिनपरिसरातकार्यकृतीकरणेकरीता,अध्ययनप्रकीयासुलभहोईलअशीआवश्यकसाहित्यसाधनेविद्यार्थ्यानासर्वशिक्षाअभियानअंतर्गतपुरविणेतयेतात.

सन2016-17मध्येकेाल्हापूरजिल्हयातीलप्रवर्गनिहायदिव्यांगविद्यार्थ्यांचीमोजमापशिबीरामधूनअलिम्कोतज्ञांमार्फततपासणीकरुनविशेषगरजाअसणा-या(दिव्यांग)561विद्यार्थ्यांना738साहित्यसाधनेनिश्चितकरणेतआलेलीआहेत. या साहित्यच्या वितरणाचा शुभारंभगुरूवारदिनांक 06 जुलै 2017 रोजीदुपारी 1.00 वाजताराजर्षिशाहूछत्रपतीसभागृहजिल्हापरिषद, कोल्हापूर येथे करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हायतील 56 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित  सत्कार करणेत आला. या संयुक्त कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे,  जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. एल. एस. पाटील, डीआयईसीपिडी चे प्राचार्य मा. डॉ. विलास पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्री. सुभाष चौगुले,  यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू  डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना निसर्गाने अन्याय न करता जे व्यंग दिलेले आहे त्या मोबदल्यात एक असामान्य शक्तीही दिलेली असते. या जाणिवेतून समाजातील घटाकांनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, व उच्च शिक्षा अभियानाच्या एकत्रित संयोगातून विकास साधता येईल असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रू.42 लाख किमतीचे साहित्य वाटप केलेचे सांगितले. कोल्हापूर जिल्हयाने शिष्यवृत्ती परीक्षेत 56 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थान पटकावलेचे सांगितले. यावेळी शिक्षण सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी आपल्या मनोगतात शिक्षण विभाग राबवित असलेले उपक्रम व शाळांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, डायसी प्लेअर, सीपी चेअर, एम.आर. किट, व्हिलचेअर, श्रवणयंत्र, ब्रेल कीट या साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.

 

शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                          जिल्हापरिषद,कोल्हापूर

————————————————————————————————————————————————