दिव्यांग उन्नती अभियान कार्यशाळा दि.30.6.18

दिव्यांग उन्नती अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा बाबत.

दि. 26 जून 2018 इ. रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत “ दिव्यांग उन्नती अभियान “ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली. सदर योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दि. 30 जून 2018 इ. रोजी राजर्षि शाहू छत्रपती सभागृह, जि.प.कोल्हापूर येथे मा.सौ.शौमिका अमल महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

  • सदर प्रसंगी मा.सौ.शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर यांनी सदरचे अभियान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर असेल आणि सदरचे अभियान सर्व पदाधिकारी यांना सोबत घेवून पूर्ण करण्यात येईल असे सांगून मनोगत व्यक्त केले.
  • मा.श्री.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अभियानातील अपंगत्वाचे 21 प्रकार ओळखण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या.
  • मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती अर्थ व शिक्षण समिती यांनी सदर अभियानासाठी सर्व पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग असेल असे सांगितले.
  • मा.श्री.रविकांत आडसुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी सदर अभियानाचे सादरिकरन करुन संपूर्ण अभियानाचे उद्दिष्ठ व उद्देश याची सविस्तर माहिती सांगितली.
  • श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी यांनी अभियानाचे प्रस्तावीक केले.

याप्रसंगी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष जि.प.कोल्हापूर, मा.श्री.राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी

अधिकारी (ग्रा.पं.), मा.श्री. सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व सन्मा.जि.प.सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी (सर्व), तालुका आरोग्य अधिकारी (सर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी (सर्व) विस्तार अधिकारी पंचायत (प्रत्येक तालुक्यातून एक) विस्तार अधिकारी आरोग्य (प्रत्येक तालुक्यातून एक) ASSK ब्लॉक मॅनेजर (सर्व) मोठया संख्येने उपस्थित होते.

  • यापुढील टप्पा खालीलप्रमाणे –

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळ www.divyangunnatizpkolhapur.com वर online उपलब्ध करणे.

अ.क्र. बाब/मुद्दा कालमर्यादा/ दिनांक जबाबदारी
जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 30/06/2018 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र)

समाजकल्याण अधिकारी

तालुकास्तरीय कार्यशाळा दि. 02/07/2018       किंवा       दि. 03/07/2018 गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) विस्तार अधिकारी (आरोग्य)
ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा. दि. 05/07/2018 किंवा  दि. 06/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक/ आरोग्य सेवक/ सेविका, प्रभाग सचिव
प्रत्यक्ष सर्व्हेचा दिवस दिव्यांग व्यक्तींचे फॉर्म भरणे/ नोंदणी करणे. दि. 07/07/2018 ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, आशा/ अंगणवाडी सेविका
भरलेले फॉर्म online करणे. दि. 08/07/2018  ते 15/07/2018 ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक, ASSK केंद्रचालक, प्रभाग सचिव.