दिनांक  26/06/2018 इ.रोजी  लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू  महाराज यांची 144 वी जयंती साजरी.

धर्मभेद,जातीभेद, अस्पृश्यता आणि निरक्षरता यांच्या विरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून कोल्हापूर नगरीला या राजाच्या कार्यकतृत्वाचा वसा आणि वारसा लाभला हे कोल्हापूर जिल्हयांचे भाग्य आहे. असे उद्गगार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांनी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती  यांच्या 144 व्या जयंती निमित्त्य कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमांत काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी राजर्षी शाहूनी स्त्री शिक्षण,बहुजन समाजाचे शिक्षण,कृषी, व्यापार जलसंधारण या क्षेत्रात दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाची माहिती सभागृहाला विषद केली . या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी राजर्षी शाहूचे कार्य आणि त्याच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून सभागृहाला मंत्रमुग्ध्‍ केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष मा.सौ.शौमिका महाडिक यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला.  या प्रसंगी समाजकल्याण सभापती मा.श्री. विशांत महापूरे, , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री.रविकांत आडसुळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) श्री.राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, प्रकल्प संचालक,जिग्रावियं श्रीम.सुषमा देसाई, कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.तुषार बुरुड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, यांच्यासह व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा.संजय लोंढे  यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले. तसेच कुमारी अपेक्षा सकटे या इ.2 री च्या  बालिकेने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी अप्रतिम मनोगत व्यक्त केले. याप्रंसगी अधिकारी, कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व जिल्हा परिषद  कर्मचारी संघटनेच्या वतीने रक्तदान,रांगोळी व विद्युत रोषणाई केल्यामुळे कार्यक्रमांला महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

 

 

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                                     जिल्हा परिषद, कोल्हापूर