मा.श्री.चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पूणे विभाग,पूणे यांनी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम राबविणेसाठी विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे व सोलापूर या पाचही जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समिती मधील सर्व कार्यालयात यशस्वीपणे राबविणेसाठी शनिवार दिनांक -15 जुलै,2017 रोजी मुख्य सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय,पूणे येथे सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक,खाते प्रमुख्य,सर्व गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी व कक्ष अधिकारी,अधिक्षक यांची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.
मा.विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवीसो यांनी सदर कार्यशाळेत त्यांनी यापूर्वी कार्यरत असतांना जिल्हाधिकारी, पूणे,सहकार आयुक्त, या ठिकाणी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम कश्या पध्दतीने राबविले याची सविस्तर माहिती व अभियान यशस्वी केलेची माहिती दिली, तसेच आता विभागीय आयुक्त कार्यालय पूर्ण व त्याअंतर्गंत सर्व जिल्हाधिकारी ते तलाठी कार्यालयापर्यंत व जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व कार्यालयात हे अभियान राबविणेबाबत पॉवर प्रेझेंटेशनव्दारे सादरीकरण करुन सविस्तर माहिती देवून उपस्थित केलेल्या शंकाचे सुध्दा निरसन केले.सदर अभियानाचा पहिला टप्पा हा अभिलेख वर्गीकरण अद्यावत करतांना प्रलंबित कामाचा शोध घेवून प्रलंबीत कामे निश्चित करुन अभिलेख वर्गीकरण अ,ब,क व ड मध्ये करुन अभिलेख कक्षामध्ये योग्य प्रकारे अभिलेखांची मांडणी दिनांक-31 जुलै 2017 पर्यंत पूर्ण करणेबाबत,तदनंतर प्रलंबित कामाची (संदर्भाची) निश्चिती करावी व ते विहित कालावधीत निर्गत होणेकरीता नियोजन करणेबाबत सूचना दिल्या.
सदर कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष अभियान हे एप्रील 2017 पासून जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समित कार्यालयात सुरु करणेत आले व याबाबत जिल्हा परिषदेने व पंचायत समितीने आतापर्यंत केलेल्या अभिलेख वर्गीकरणाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पॉवर प्रेझेंटेशनव्दारे कार्यशाळेत सादरीकरण केले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र) चंद्रकांत वाघमारे यांनी अभिलेख वर्गीकरण करतांना गठ्ठा कश्याप्रकारे बांधावा याबाबत व्हिडीओ क्लिपव्दारे सविस्तर माहिती दिली.
मा.विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद राबवित असलेल्या स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष व कार्यालय अभियानाचे कौतुक करुन पुढील कामास शुभेच्या दिल्या. कार्यशाळेस कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) खातेप्रमुख्य, सर्वगटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,कक्ष अधिकारी व अधिक्षक उपस्थित होते.