जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर. करवीर व गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

करवीर गगनबावडा तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

दि. 15 मार्च, 2017 ते 31 मार्च, 2017

दि.8/02/2017 रोजी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर या केंद्राच्या कामकाजाबाबत बैठक संपन्न झाली.  सदर बैठकित कोल्हापूर जिल्हयातील  करवीर व गगनबावडा या दोन तालुक्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण ग्रामीण भागात जिल्हा परिषद, कोल्हापूर  यांच्यामार्फत  व महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांचेमार्फत दि. 15 मार्च,2017 ते 31 मार्च, 2017 या कालावधीत करण्याचे ठरविले आहे.

सदर अनुषंगाने करवीर व गगनबावडा या तालुक्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम      करणा-या दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, स्वयंसेवी संस्था व दिव्यांग व्यक्ती यांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण व्हावे यासाठी सर्वेक्षण करणा-या यंत्रणेस आवश्यक ते सहकार्य करावे. सदर सर्वेक्षणातुन मिळणा-या माहीतीचा उपयोग अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या योजना राबविण्यासाठी होणार आहे.या सर्वेक्षणापासून अस्थिव्यंग प्रवर्गातील एकही दिव्यांग व्यक्ती सुटणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

या बाबतीत अधिक माहितीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.यंाचेशी संपर्क साधावा.

फोन.न. 0231-2656445

E-mail-swozpkop@gmail.com