जिल्हयातील ग्रामीण जनतेचा आरोग्याचा स्तर सुधारणे करिता व आरोग्य विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जनतेला लाभ होणेसाठी करावयाच्या उपाय योजना याबाबत आढावा व नियोजन बैठक दि.18/04/2017 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचे अध्यक्षतेखाली घेणेत येवून पुढील प्रमाणे कार्यवाही करणेचे आदेश दिले. सदर आढावा व नियोजन बैठकीस मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पाटील, मा.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एल.एस.पाटील, मा.प्राचार्य, राज्य व आरोग्य कु.क.प्रशिक्षण केंद्र डॉ.सी.जे.शिंदे कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.परितेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.फारुक देसाई, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती खंदारे, तालुका स्तरावरुन सर्व वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
- प्रसव पूर्व गर्भलिंग निदान चाचणी बाबत ग्रामीण भागामध्ये विविध माध्यमांचा वापर करुन चांगल्या प्रकारे जनजागृती करणेत यावी. तसेच जनतेच्या माहिती करिता C.P.N.D.T. helpline Number 18002334475 सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करुन देवून त्याची जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.
- C.P.N.D.T.अंतर्गत कार्यक्रमाचा आढावा घेवून जिल्हयातील बोगस डॉक्टर बाबत सखोल चौकशी करुन धडक मोहिमे अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांचेवर तात्काळ F.R.I.दाखल करणे बाबत सक्त सुचना दिल्या व या कामामध्ये हयगय झालेस संबधितांवर जबाबदारी निश्चित करणेत येईल.
- कोल्हापूर जिल्हयामध्ये होणा-या B.S.K. अंतर्गत जिल्हा स्तरावर शस्त्रक्रिया करणेसाठी कोल्हापूर मेडीकल कॉलेजचे बाल शल्य चिकीत्सक डॉ.हिरुगडे, यांंनी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल जिल्हा स्तरीय समिती तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
- आशा योजने अंतर्गत आशांचे रिकत पदा बाबत आढावा घेवून 1 मे च्या ग्राम सभेमध्ये सर्व रिक्त पदे भरणेसाठी संबधित पदाधिकारी व अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करुन आशांची पदे भरुन घेणेच्या सुचना देणेत आल्या
- ग्राम स्तरावरील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अंतर्गत दि.24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत आरोग्य ग्राम सभा आयोजित करुन आरोग्याच्या विविध योजना तसेच स्वाईन प्ल्यू व उष्माघात बाबत, तसेच ग्राम स्तरावरील आरोग्य विषयक विविध कामांचा आढावा व नियोजन करणेत यावे.
- जननी शिशू सुरक्षा योजने अंतर्गत आरोग्य संस्थेच्या ठिकाणची Ambulance (102) सुस्थितीमध्ये ठेवून गरोदर मातांना प्रसुतिसाठी व एक वर्षा खालील बालकाना घरातून दवाखान्या पर्यत व दवाखान्यातून घरा पर्यतच्या सर्व सेवा मोफत उपलब्ध करुन द्याव्यात. 102 व 108 ॲम्ब्यूलन्सचा वापर व्यापक जनजागृती करुन वाढवावा. जननी शिशू सुरक्षा योजना अंतर्गत गरोदर माताना जो मोफत आहार दिला जातो त्याची गुणवत्ता पडताळणी करणेत यावी.
- राष्ट्ीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु असलेल्या बांधकामा बाबत विचारपूस करुन उर्वरीत बांधकाम व त्यासाठी लागणारे टेंडर्स लवकरात लवकर पूर्ण करुन पावसाळ्या पूर्वी बांधकाम पूर्ण करणेत यावे.
- क्वॉलीटी ॲश्यूरन्स (जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती) अंतर्गत निवड केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा राज्यस्तरावर पाठपुरावा करुन राष्ट्ीय पातळवर मानांकन प्राप्त करणेसाठी प्रयत्न करणेत यावेत.
- नियमीत लसीकरणा बाबत आढावा घेवून झालेल्या कामाची पडताळणी करणेसाठी क्लस्टर सर्वे करणेत यावा.
- बाल मृत्यूचे कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत निश्चीत करणे बाबत सुचना देणेत आल्या.