जिल्हा परिषदेत तथागत बुद्ध व विपश्यना या विषयावर श्री इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतर्गत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोंजन करणेत येते. दि. 30-6-2017 इ. रोजी सायं. 4-30 वाजता राजर्षि शाहू सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यान मालेचे चौथे पुष्प सुप्रसिध्द वक्ते व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख यांनी गंुफले. यावेळी जिल्हा प्रकल्प संचालक श्री. डॉ. हरिष जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा कृषि अधिकारी श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचेसह जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. इंद्रजित देशमुख यांनी तथागत बुध्द व विपश्यना या विषयांवर मार्गदर्शन करताना – माणसाच्या जिवनात विपश्यनेचे महत्व सांगून तथागत बुध्दांच्या आष्टांग मार्गाची महती आपल्या ओघवत्या वाणीने कथन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विपश्यनेच्या मार्गाने माणसाला अंतिम सुखापर्यंत पाहोचता येते ही बुध्दांची शिकवण  विविध दृष्टांतामधूुन समजावून दिली. तसेच बुध्दत्वाची लक्षणे सांगताना अनंत मैत्री म्हणजे काय ? याविषयी ओघवत्या शैलित अर्थबोध केला.

शेवटी सदर कार्यक्रमांचे आभार सौ. जे. एस. जाधव, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी मानले.

सही/-

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, कोल्हापूर