जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन 2018-19 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे. सदर प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण (1107), ग्रामपंचात महिला सदस्य (क्रांतीज्योती) प्रशिक्षण (738),  ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी प्रशिक्षण (295),  विस्तार अधिकारी प्रशिक्षण (35), जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी प्रशिक्षण प्रशिक्षण (340), राज्यांतर्गत अभ्यास दौरा (40), प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली प्रशिक्षण (156), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) मानव संसाधन केडर मॅनेजमेंट प्रणाली प्रशिक्षण (50), थेट निवडून आलेले सरपंच प्रशिक्षण इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रम पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, गारगोटी ता. भुदरगड, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, गारगोटी ता. भुदरगड, यांचे मार्फत घेतले जाणार आहेत. तर उर्वरित प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, कसबा बावडा आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत पूर्ण केले जाणार आहेत.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एप्रिल 2017 नंतर निवडून आलेले व अद्याप क्षमता बांधणी प्रशिक्षण न घेतलेले सरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत महिला सदस्य यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

(अमन मित्तल)                           (सौ. शौमिका महाडिक)

मुख्य कार्यकारी अधिकारी                     अध्यक्ष

जिल्हा परिषद कोल्हापूर             जिल्हा परिषद कोल्हापूर