जिल्हास्तरीय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेत पन्हाळा  गटाची  बाजी

जिल्हा परिषद, कोल्हापूर शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत सन 2017-2018 च्या जिल्हास्तरीय  सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 11/1/2018 ते 13/1/2018 या कालावधीत  केशवराव भोसले नाटयगृह, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या  स्पर्धेचा उदघाटन समारंभ  जिल्हा परिषद,कोल्हापूरच्या अध्यक्षा मा .सौ. शौमिका महाडिक व मा.डॉ.श्री.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, कोल्हापूर  यांचे शुभहस्ते  संपन्न झाला. स्पर्धेस प्रमुख पाहूणे म्हणून  तुझ्यात जीव रंगला फेम राणा -श्री. हार्दिक जोशी  व  तुझ्यात जीव रंगला फेम अंजली- श्रीमती.अक्षया देवधर तसेच कलर्स वाहिनीवरील सुर नवा -ध्यास नवा फेम  युवा गायक श्री. प्रल्हाद जाधव  हे उपस्थित होते.  तसेच कार्यक्रमास मा.श्री.सर्जराव पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर,  मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापती,  शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद कोल्हपूर, मा.श्री.विशांत महापुरे, सभापती, समाजकल्याण समिती, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.सर्जेराव पाटील (पेरिडकर),  सभापती, बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद कोल्हापूर, मा.सौ.शुभांगी शिंदे, सभापती, महिला व बालकल्याण समिती जि.प.कोल्हापूर  श्री.बी.बी.भंडारे, शिक्षणाधिकारी (निरंतर ) इ.उपस्थित होते.

सदर स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यानी उत्सफूर्तपणे आपली कला सादर केली. स्पर्धचा निकाल खालीलप्रमाणे

लहान गट- 1.समूहगीत- प्रथम क्रामंक-  विद्यामंदिर गोरंबे  ता.कागल

व्दितीयक्रमांक- विद्यामंदिर शिनोळी खुर्द ता.चंदगड

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर जांभळी  नं .1 ता.शिरोळ

2.समूहनृत्य -प्रथम क्रमांक- विद्यामंदिर कोतोली ता.पन्हाळा

व्दितीय क्रमांक-कन्या किणी विद्यामंदिर ता.हातकणंगले

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर लहान बारवे  ता.भूदरगड

3 नाटयीकरण- प्रथम क्रमांक- विद्यामंदिर दुंडगे  ता.गडहिंगलज

व्दितीय क्रमांक- विद्यामंदिर  आसूर्ले ता.पन्हाळा

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर सरनोबतवाडी  ता.करवीर

        4.कथाकथन  -प्रथम क्रमांक- विद्यामंदिर ऐरेवाडी ता.राधानगरी

व्दितीय क्रमांक – विद्यामंदिर  शिरोळ  ता.शिरोळ

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर उर्दू नेसरी ता.गडहिंगलज

5.प्रश्नमंजूषा -प्रथम क्रमांक- केंद्रशाळा  नागनवाडी  ता.चंदगड

व्दितीय क्रमांक-कन्या  विद्यामंदिर तुरंबे ता.राधानगरी

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर व्हनाळी  ता.कागल

 

         मोठा गट 1.समूहगीत-प्रथम क्रामंक- विद्यामंदिर कासारी   ता.कागल

व्दितीय क्रमांक-विद्यामंदिर लहान बारवे ता.भूदरगड ता.

तृतीय क्रमांक- विद्यामंदिर बागीलगे   ता.चंदगड

2.समूहनृत्य -प्रथम क्रमांक- विद्यामंदिर हरपवडे ता.पन्हाळा

व्दितीय क्रमांक- विद्यामंदिर म्हाळूंगे ता.करवीर

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर कपिलेश्वर ता.राधानगरी

  1.          नाटयीकरण -प्रथम क्रमांक- विद्यामंदिर करंबळी   ता.गडहिंगलज

व्दितीय क्रमांक- विद्यामंदिर भाटीवडे  ता.भूदरगड

तृतीय  क्रमांक-  विद्यामंदिर पोहाळवाडी   ता.पन्हाळा

4.कथाकथन – प्रथम क्रमांक- विद्यामंदिर देवर्डे  ता.आजरा

व्दितीय क्रमांक- विद्यामंदिर चन्नेकुपी  ता.गडहिंगलज

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर  पुनाळ  ता.पन्हाळा

5.प्रश्नमंजूषा – प्रथम क्रमांक- विद्यामंदिर  भडगांव  ता.कागल

व्दितीय क्रमांक- विद्यामंदिर पोहाळवाडी  ता.पन्हाळा

तृतीय क्रमांक-  विद्यामंदिर  कुमरी  ता.गडहिंगलज

या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पन्हाळा गटाने पटकाविले व उपविजेते पदाचा बहुमान कागल व गडहिंग्लज गटाने पटकाविला. बक्षिस वितरण समारंभ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा.श्री.किरण लोहार  व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.सुभाष चौगुले,उपशिक्षणाधिकारी श्री.टी.ए.नरळे यांच्या उपस्थित पार पडला कार्यक्रम यशस्वी करणेसाठी  शिक्षण विस्तार अधिकारी  श्री. जे.टी.पाटील, श्री. एम.आय.सुतार  श्रीमती.जे.एस.जाधव, श्री.डी.सी.कुंभार व श्रीमती.एस.आय.हेद्दूर  यांनी  विशेष परिश्रम घेतले.

 

शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                                                   जिल्हा परिषद,कोल्हापूर