राष्ट्रीय जंत नाशन मोहिमेचा शुभारंभ दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी कुमार विघा मंदिर व कन्या विद्या मंदिर उचागंाव ता. करवीर येथे मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा , जि.प. कोल्हापूर यंाच्या हस्ते शाळेतील विद्यर्थ्यांना जंतनाशक गोळी देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. महेश चौगले, पंचायत समिती सदस्य मा. श्री. सुनिल पोवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी श्री सचिन घाटगे उपस्थित हेाते. तसेच उचगांव ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री. प्रतिम बनसोडे, रमेश वाईंगडे, विजय यादव उपस्थित होते-
या प्रसंगी बोलताना मा. शौमिका माहाडिक म्हणाल्या की, या मोहिमे अंतर्गत अंगणावाडी, प्राथमिक शाळा, शासन अनुदानित हायस्कुल मधील 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलीनां जंतनाशन गोळी देण्यात येणार आहे. एकही लाभार्थी या मोहिमेत वंचित राहणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी असे सूचित केले.
या मोहिमेचे उदिदष्ट बालकांचे आरोग्य, त्यांची पोषण स्थिती सुधारणे, शिक्षणांची संधी व जीवनाचा दर्जा सुधारणे हा आहे असे डॉ. पाटील यांनी नमुद केले.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलवडे जी. डी. श्री. इंदूलकर, श्री, आष्टेकर वि.अ.आ. श्री. पोवार विक्रम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आर.आर. माळगांवकर यांनी मानले
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, कोल्हापूर