कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

 

दि.5 जून,2017 – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हयाने हागणदारीमुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, जिल्हयाची वाटचाल आता हागणदारीमुक्तीच्या अंतिम टप्प्याकडे सुरू असून  यासाठी जिल्हास्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.शौमिका महाडिक,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.सर्जेराव पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.डॉ.कुणाल खेमनार,तसेच शिक्षण सभापती मा.श्री.अंबरिशसिंह घाटगे,तसेच बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा.श्री.सर्जेराव पाटील-पेरिडकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख व सर्व विभागांचे खातेप्रमुख  उपस्थित होते.

वर्ष 20115-16 मध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया मार्फत झालेल्या सर्वेनुसार कोल्हापूर जिल्हा देशात पाचव्या क्रमांकावर होता आता यापुढे देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम तेवढयाचं उत्साहाने करण्याचे आवाहन मा.अध्यक्षा यांनी या कार्यशाळेमध्ये केले तसेच पर्यावरण आणि जलस्त्रोत प्रदुषित होणार नाहीत यासाठी  जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रम,योजनांमध्ये उत्कृष्ट लोकसहभाग हे कोल्हापूर जिल्हयाचे वैशिष्टय असून,यापुढे देखील पर्यावरणपुरक आणि स्वच्छतेचे उपक्रम असेच लोकसहभागातून राबविले जातील.यासाठी लोकसहभाग आणि ग्रामीण व शहरी उपाययोजना यांच्यासोबत जिल्हयात घनकचरा -सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करणेबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले. पाणी व स्वच्छता विभागाच्या मा.श्रीम.सुषमा देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ग्राम पंचायतस्तरावर आणि घरगुती स्तरावर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थान कसे करता येईल याबाबत माहिती दिली.

या कार्यशाळेच्या सुरूवातीला वर्ष 2016-17 मध्ये पाणी व स्वच्छता विभागामार्फत झालेल्या कामांचा माहितीपट दाखविण्यात आला.तसचे मागील वर्षी पर्यावरणपुरक गणेशोत्सव मध्ये सर्वच तालुक्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतल्या बदद्ल सर्व तालुक्यातील गट विकास अधिका-यांना प्रशस्तिप्रत्र देवून सन्मानित केले.तसेच पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.4 जून,2017 रोजी सर्व ग्राम पंचायतींनी ¯»ÖÖÛÙüú कचरा वेचू,पर्यावरण ¾ÖÖ“Ö¾Öæ  या मोहिमेतर्गंत प्लास्टिक कचरा जमा केला आहे. यातील कार्यशाळेसाठी उपस्थित पंचगंगा नदीकाठच्या गावांना कार्यशाळेस येताना जमा झालेले प्लास्टिक  घेवून येणेबाबत सुचित केले होते त्याप्रमाणे करवीर,शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातून एकूण 1 ट्रॉली,58 पोती जाम झालेले प्लास्टिक हे कार्यशाळेच्या शुभारंभापूर्वी  अवनी या संस्थेस दिले.

या कार्यशाळेसाठी  सर्व गटविकास अधिकारी,उपअभियंता,(ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), गट संसाधन केंद्र,पंचगंगा नदी काठच्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.दुपारच्या सत्रात मा.श्री.उदय गायकवाड,पर्यावरतज्ञ,किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष श्री.गावडे,अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनुराधा भोसले,घनकचरा सांडपाणाी व्यवस्थापन तज्ञ श्री.सुभाष नियोगी यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.