केंद्र पुरस्कृत योजना

पशुरोगनियंत्रण (अॅस्कॅड योजना)

केंद्रशासन ७५ टक्के व २५ टक्के राज्य हिस्सा पी. पी. आर. (शेळयामेंढया), मानमोडी (कोंबडया), घटसर्प, फर्याक रोगाचे नियंत्रण व उच्चाटन करणे हा उद्देश बहुमुल्य पशुधनाच्या आरोग्यरक्षणासाठी गावागावात लसीकरण धडक मोहिम.

माहिती प्रशिक्षण व संपर्क पशुसंवर्धन (अॅ्स्कॅड योजना)

पशुसंवर्धन व पशुआरोग्य रक्षण विषयक माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी योजना. पशुपालनातील स्थानिक अडीअडीचणीं बाबत मार्गदर्शन

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) -पशुवैदयकिय दवाखान्यांची स्थापना

बिगर डोगरी ५००० पशुधन घटकास एक दवाखाना निकष डोंगरी ३००० पशुधन घटकास एक दवाखाना निकष पशुवैदयकिय सेवा दुर्गम भागात पुरविणे हा उद्देश. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन दयावी.

पशुपालकाच्या जमिनीवर वैरण उत्पादन उत्तेजन योजना

सकस वैरण पिकाकरिता सुधारित बियाणाचे वाटप अनुदान उपलब्धतेनुसार
अफ्रिकन टॉल मका, ल्युसर्न, कडवळ, चवळी इ. बियाणांचा पुरवठा

एकात्मीक कुक्कुट विकास कार्यक्रम

एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पिलांचे वाटप ( १०० पक्षांचा १ गट) या दोन योजना ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गतील लाभार्थीना या योजनेचा लाभ देता येईल. यामध्ये रु.८०००/- प्रती योजना प्रती लाभार्थीस अनुदान म्हणुन मंजुर करणेत येईल. व ५० टक्के रक्कम लाभार्थीने स्वतः उभारावयाची आहे.

कामधेनू दत्तक ग्राम योजना

सदर  योजना  सन  २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७८ गावात राबवण्यात येत आहे . प्रति गाव रु १,५२,५०० याप्रमाणे तरतूद आहे . या योजनेअंतर्गत ३०० प्रजननक्षम गाय / म्हशी  असलेल्या गावाची निवड करण्यात येते . या योजनेअंतर्गत पशुपालन मंडळाची स्थापना ,जंतनिर्मूलन, गोचीडंगोमाशी निर्मूलन, लसीकरण, वंधतवनिवारण, निकृष्ट वैरणी वर प्रक्रिया, वैरण विकास, नाविन्यपूर्ण  उपक्रम , मलयुग निसारन, पशुपालन सहल इ . कार्यक्रम राबिविण्यात येतो.

विविध पशुवैद्यकीय संस्थांना औषधी पुरवठा करणे.

सदर योजनेअंतर्गत स्थानिक स्थरीय श्रेणी -१ व श्रेणी -२ अशा एकूण १३९ संस्थांना औषधी पुरवठा करण्यात येतो.