जिल्हा नियोजन समिती मार्फत 2016-17 नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये कॅन्सर पूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक यांचे हस्ते राजर्षि शाहू छत्रपती सभागृह येथे दिपप्रज्वलाने संपन्न झाला. या प्रसंगी आरोग्य बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील (पेरीडकर) , पंचायत समिती करवीरचे सभापती श्री. प्रदीप झांबरे, आरोग्य समिती सदस्या सौ. पुप्पा वसंत आळतेकर, सौ. सुनिता रमेश रेडेकर , डॉ एल एस पाटील , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरज पवार, कॅन्सर तज्ञा, ॲपल सरस्वती कॅन्सर हॉस्पीटल च्या अवटी मॅडम तसेच पंचायत समिती करवीर चे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी नाविन्यपूर्ण योजना असून यामध्ये आशाचे कॅन्सर तज्ञा मार्फत प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जावून आशा मार्फत सव्हेक्षण, आरोग्य शिक्षणसाठी माहिती देण्यात येणार आहे. संशयित रुग्णांचे कॅन्सर तज्ञांचे शिबीर आयोजन करुन, आवश्यक तपासणी , उपचार बाबत माहिती दिली.
योजनेचा करवीर तालुक्याचा कृती आराखडा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कुणाल खेमनार यांचे मागदर्शनाखाली तयार करणेत आला आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलावडे यांनी सांगितले. तालुक्याच्या सहा प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी कॅन्सरचे शिबीर घेण्यात येणार आहे. या प्रसंगी जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉ सरज पवार उपस्थित होते त्यांनी कॅन्सरचे रुग्ण वाढले असून तंबाखु हे कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. कॅन्सर तज्ञांमार्फत आशा प्रशिक्षण घेण्यात येणार असून गर्भाशय मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर, मुख कॅन्सर ची माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम, सुदृड जीवनशैली आणि व्यसनापासून दूर राहणे हा कॅन्सर प्रतिबंधाचे महत्व नमुद केले. तसेच आशा हया सर्व सामान्याच्या आशा असून त्यांनी या नाविन्यपूर्ण योजनेत हिरहिरीने सहभाग नोंदवावा. पंचायत समिती करवीरचे सभापती यांनी सदरची योजना तालुक्यातमध्ये चांगल्या प्रकारे राबविण्यात येईल असे सांगितले.
उपस्थितांचे आभार डॉ.फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. डॉ उषादेवी कुंभार, अति. जि.अ.अ व पंचायत समिती करवीरचे अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले