किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणास दि. 26.11.2018 रोजी पासून सुरूवात झाली आहे. वैयक्तिक स्वच्छतेमधील अतिशय महत्वाचा मानला जाणार विषय हा शालेय मुलींपर्यंत पोहचविणे तसेच या विषयाबाबत शास्त्रशुध्द माहिती मुलींना मिळावी. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रम राबविला जात आहे.

दि. 26.11.2018 रोजी पंचायत समिती भुदरगड, चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये या प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. तालुकास्तरीय पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार तालुकास्तरावर एकूण 2534 सहाय्यक प्रविण प्रशिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्हास्तरावर  प्रविण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रविण प्रशिक्षकांमार्फत तालुकास्तरीय सहाय्यक प्रविण प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात  आहे. तालुकास्तरीय  प्रशिक्षक हे प्रत्यक्ष शाळांमध्ये  6 सत्रांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

प्रशिक्षणादरम्यान मासिक पाळीबाबत माहिती पुस्तिका, हॅन्डबुक आणि लॅमिनेटेड चार्ट असे प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर