सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फटका प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. अजूनही अनेक शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश शिल्लक आहेत. त्यामुळे शाळांनी विहीत कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. येत्या 31 ऑगस्टला सदर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉक म्हणजेच बंद केली जाणार आहे अशा सुचना प्राथमिक शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या आहेत.कोल्हापूर जिल्हयामध्ये RTE अंतर्गत 345 शाळांमधील 3486 जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. एकूण 2996 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले असून NIC सेंटर, पुणे यांचेकडून प्रथम फेरीतील प्रवेशासाठी 2388 विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. मात्र त्यापेकी केवळ 1016 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले असून अद्याप 1372 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण सहसंचालक श्री. दिनकर टेमकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली असून त्यामध्ये सदर प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उर्वरीत मुदतीत शाळांनी RTE प्रवेश प्रक्रिया राबविताना अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रलंबित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणेसाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधावा व विहीत मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे. सही/- (श्रीम. आशा उबाळे) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर