आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर अतिसार नियंत्रण पंधरवडा 28 मे ते 9 जून 2018

 

अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट़ीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उदिदष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामध्ये अतिसार नियत्रंण पंधरवडा 28 मे ते 9 जून 2018 कार्यक्रम दोन आठवडयामध्ये राबविणेत येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळया यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके, ओआरएस झिंक या गोळयांचे घरोघरी वाटप, आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करणे व अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार या सर्व गोष्टी या कार्यक्रमांतर्गत येतात.

जिल्हयातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, नगरपालिक/महानगरपालिकांचे रुग्णालय, हेल्थ पोस्ट इत्यादी स्तरावर अतिसार नियंत्रण राबविण्यात येत आहे.

या करीता जिल्हा कार्यबल गट समितीची सभा मा. नंदकुमार काटकर, प्र.जिल्हाधिकारी  कोल्हापूर व मा.संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली दि.24/05/2018 रोजी मा.जिल्हाधिकारी यांचे दालनात संपन्न झाली.  सा सभेसाठी ,  डॉ. एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,  हे  उपस्थित होते. या सभेमध्ये खालील प्रममाण े माहिती सादर करणेत आली.

  • अतिसार नियंत्रण पधरवडयातील घटक
  • 5 वर्षाखालील बालकांना आशा स्वयंसेविका मार्फत घरभेटी देवून ओआरएस पाकिटांचे वाटप करणे तसेच प्रात्यक्षिके दाखविणे व आरोग्य शिक्षण देणे
  • आरोग्य संस्था स्तरावर ओआरएस व झिंक कोपरा कॉर्नर प्रस्थापित करणे
  • 2944 शासकीय व निमशासकीय शाळा तसेच 4397 अंगणवाडी मध्ये हात स्वच्छ धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांमार्फत दाखविणे येणार आहे.
  • ग्राम आरोग्य पोषण दिनी पोषण आहारासंबधी प्रात्यक्षिके व समुपदेशन करणे.
  • अतिसाराची बालके शोधुन उपचार देणे, तीव्र अतिसार असलेल्या बालकांना संदर्भित करणे.
  • पंधरवडयामध्ये अतिसारामुळे मृत्यू झालेल्या बालकांना सदंर्भित करणे
  • पंधरवडयामध्ये अतिसारामुळे मृत्यू झालेल्या बालकांचा वरिष्ठ कार्यालयांना सादर करणे.
  • ओआरएस आणि झिंकचे फायदे
  • यामुळे जुलाब कमी होतात.
  • याने जुलाब/अतिसार लवकर बरा होतो.
  • पुढील 3 महिन्यापर्यंत अतिसार व न्युमोनिया होण्यापासून बचाव होतो.
  • जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकारने प्रमाणित केलेले आहे.
  • अतिसार व्यवस्थापन उपचाराबाबतचे महत्वाचे संदेश
  • अतिसार झाल्याबरोबर उदा. एका दिवसामध्ये 3 पेक्षा जास्तवेळा जुलाब होणे. लगेच ओआरएसचे द्रावण आणि इतर द्रव पदार्थ दया. आणि अतिसार थांबेपर्यंत देत रहा.
  • अतिसार झालेल्या बालकाला 14 दिवसापर्यंत झिंक गोळी दया. अतिसार होणे थांबले तरी गोळी देत रहा.
  • अतिसारामध्ये ओआरएस झिंक देणे हे अतिसारावरील उपचाराची योग्य पध्दती असुन अतिसार लवकर बरा होण्यास फायदेशीर आहे.
  • बाळाची विष्ठा लवकर आणि सुरक्षित प्रकारे नष्ट करावी.
  • अतिसारादरम्यान जे बाळ स्तनपान घेत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवा
  • आजारादरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान दया.
  • स्वयंपाक करण्यापुर्वी बालकाला जेवण भरवण्यापुर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर आणि बालकाला साफ केल्यानंतर मातेने हात साबनाने धुवून स्वच्छ करावे.
  • खालीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास बालकाला आरोग्य कर्मचाऱ्याकडे किंवा संस्थेमध्ये घेवून जावे
  1. बालक अधिक आजारी होत असेल
  2. स्तनपान करु शकत नसेल
  3. ताप येत असल्यास

कोल्हापूर जिल्हयामध्ये  0 ते 5 वर्ष वयोगटातील एकुण 220780 इतकी बालके आहेत. अतिसाराच्या सल्यासाठी वैदयकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य कंेद्र, आशा स्वयंसेविका तसेच ए.एन.एम.शी  संपर्क साधावा असे आवाहन मा. नंदकुमार काटकर, प्र.जिल्हाधिकारी  कोल्हापूर व मा.संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे. सभेचे  प्रस्ताविक डॉ. फारुख देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी केले. अभार डॉ. सुहास कोरे,  अति. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद कोल्हापूर