महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र.वैप्रोब.1096/प्र.क्र.3202/49, दि. 10 नोव्हेंबर 1998 अन्वये ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वाेतोपरी सहाय्य ठरणाऱ्या ग्रामसेवकाची आदर्श ग्रामसेवक म्हणून प्रत्येक गटाकडून एक सर्वाेत्कृष्ट ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी निवड जिल्हा परिषद स्तरावर करून त्यांचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. यांचे स्वाक्षरीने प्रशस्ती पत्रक व सन्मान पदक या स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करणेत येतो.