कोल्हापूर जिल्हयामध्ये शासनाच्या कोणत्याही परवानगी शिवाय अनधिकृत चालू असलेल्या 24 प्राथमिक शाळा आहेत. पालकांनी सदर शाळामध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. यासाठी सदर अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या शाळांची यादी दि.05/05/2017 रोजी दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेत आलेली आहे. कोल्हापूर जिल्हयातील खाजगी शिक्षण संस्थेमधील अनधिकृत सुरु असणारे वर्ग तात्काळ बंद करणेबाबत या कार्यालयाकडून दि.04/05/2017 रोजी 24 शाळांच्या अध्यक्ष/ मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस लागू करणेत आलेल्या आहेत. तथापि सदरच्या शाळा अद्यापही सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 मधील कलम 18(5) नुसार सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत व द्रव्य दंड भरणेबाबत नोटीस लागू केलेल्या आहेत. तथापि अद्यापही सदर शाळांनी दंड भरणा केलेचे दिसून येत नाही व सदरचे अनधिकृत वर्गही सुरु आहेत. याबाबत पुढील कारवाई होणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविणेत आलेले आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद, कोल्हापूर