FaceBook Like

२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर

कोल्हापूर : दि. १४.०१ .२०१९

 

ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा  जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा महाजागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन , जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत या कार्यक्रमाची नियोजन बैठक आज जिल्हा परिषद कोल्हापूर यथे आयोजित करण्यात आली होती. या नियोजन बैठकीसाठी मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर, वारकरी साहित्य परिषदेच्या  मा. सौ . मालूश्री पाटील उपस्थित होत्या.

राज्याच्या  ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सहभागातून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हा ध्वजांकित कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीस उपलबध सुविधांचा नियमित वापर, ग्रामीण कुटुंबाकडून स्वच्छता सवयीचा अंगीकार, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ,  प्लास्टिक बंदी या विषयावर गावातील ग्रामस्थ, शालेय विद्याथी] महिला यांचे प्रबोधन करण्यासाठी या कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रवचनकारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील ६० प्रवचनकारांची निवड राज्यस्तरावरून करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवचनकाराने  २४ ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छेबाबत प्रबोधन करावयाचे आहे. दि. २६ जानेवारी २०१९ रोजी जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी] २०१९ या कालावधीमध्ये हा कार्यक्रम ग्राम पंचायत स्तरावर  राबविला जाणार आहे.

या प्रवचनकारांच्या बैठकीमध्ये मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर, वारकरी साहित्य परिषदेच्या  मा. सौ . मालूश्री पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळे श्री विजय पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक , पा . व स्व. जि. प. कोल्हापूर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे तज्ञ् व सल्लागार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
April
SMTuWThFS
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930    
अभ्यागत
232,183