दि. ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोम्बर २०१९ या कालावधीत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता हि सेवा अभियान राबविले जाणार आहे . प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्राम पंचायत स्तरावर हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हास्तरा वर जिल्हा परिषद कर्मचारी व गट विकास अधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हि या अभियानाची प्रमुख संकल्पना असल्याने स्वच्छता हि सेवा अभियानातून प्लास्टिक मुक्त जिल्ह्यासाठी सर्वानी योगदान द्यावे असे प्रतिपादन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी , जी. प. कोल्हापूर यांनी केले . व अभियान यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन हि केले. या कार्याशाळेसाठी मा. आर.पी. शिवदास, अति. मु.का.अ ., जी.प.कोल्हापूर उपस्थित होते. अभियानाबाबत मा. श्रीम. प्रियदर्शिनी मोरे उप.मु.का.अ . (पा .व स्व. ) यांनी प्रास्ताविक केले.
या अभियानांतर्गत विविध उपक्रम घेतले जाणार असून त्यामध्ये तालुकास्तरावर प्रशिक्षण/ कार्यशाळा, प्रभातफेऱ्यांचे आयोजन, तरुण मंडले, सामाजिक संस्था, उद्योजक, शिक्षण संस्था, दवाखाने, शेतकरी, ग्रामस्थ यांच्या बैठक आयोजित करून त्यांना बंदी असलेले प्लास्टिक व प्लास्टिक चे दुष्परिणाम इ. बाबत मार्ग दर्शन केले जाणार आहे. शालेय स्तरावर अभियानाबाबत निबंध, चित्रकला, वक्तृत्व इ. स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. २ ऑक्टोम्बर ,२०१९ रोजी सर्व गावांमध्ये प्लास्टिक वस्तू न वापरणेबाबत शपथ घेऊन महाश्रमदान मोहिमेच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन उपक्रम राबविला जाणार आहे. व दि ३ ते २७ ऑक्टोम्बर ,२०१९ या कालावधीत संकलित प्लास्टिक पुनर्चक्रणासाठी देणे असे उपक्रम राबविणेत येणार आहेत.
या अभियानांतर्गत ग्राम पंचायत स्तरावर आवश्यक ते नियोजन करून सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
(प्रियदर्शिनी मोरे )
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा .व स्व . )
जि.प . कोल्हापूर