रविवार दि. 16 फेब्रुवारी, 2020 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अंतरिम उत्तरसुचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-
- सदर अंतरिम उत्तरसुचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
- सदर ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objections omInterium Answer Key या हेडींगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
- त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 04/03/2020 ते दि. 13/03/2020 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
- दि. 13/03/2020 नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
- उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलदवारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
- उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
- विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसुची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरूस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-
- विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इ.) दुरूस्ती करण्यासाठी दि. 04/03/2020 ते 13/03/2020 रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
(श्रीम.आशाउबाळे)
शिक्षणाधिकारी(प्राथमिक)
जिल्हापरिषद,कोल्हापूर