मा. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी ओरिजनल अप्लिकेशन 347/2016 मध्ये दिनांक 9/8/2019 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात 100% जिल्हा /तालुका / ग्रामपंचायत स्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समित्या(BMC)कोल्हापूर जिल्हयामध्ये स्थापन झालेल्या आहेत व लोक जैवविविधता नोंदवही (PBR) तयार करण्याच्या अनुषंगाने आज दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता स्व.वसंतराव नाईक समिती सभागृह जिल्हा परिषद मध्ये मा. श्री. अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)मा. डॉ. शाम बाजेकल, श्री. दौलत वाघमोेडे, जैवविविधता तज्ञ, जैवविविधता मंडळ पुणे,मा. डॉ. ए.डी. जाधव, सदस्य महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,नागपूर प्रा. डॉ. के.डी सोनवणे हेड ऑफ डिपार्टमेंट मायक्रोबायोलॉजी,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डॉ. व्ही.एस. मौनी, हेड ऑफ डिपार्टमेंट झूलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डॉ. एन. जे. बनसोडे, डेप्यूटी रजिस्टार व पशुवैद्यकीय तज्ञ (दूर शिक्षण केंद्र विभाग) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉ. ए.जी. भोईटे कृषी -वनस्पतीशास्त्र कृषि महाविद्यालय, कोल्हापूर, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी संपन्न झाली.सदर विषय तज्ञ व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्थाना उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मा. भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी जैविक विविधता व्यवस्थापन समिती Biodiversity Management Committee (BMC) व लोक जैविक विविधता नोंदवही (PBR) तयार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेली आहे. त्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था विषय तज्ञ व्यक्तीनी लोक जैविक विविधता नोंदवही (PBR) तयार करणेबाबत काय कार्यवाही करावयाची आहे याबाबत प्रास्ताविक केले.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर लोक जैवविविधता नोंदवहीचा उपयोग कायम स्वरूपी होणार असून ग्रामस्तरावर / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तयार होणा-या लोक जैवविविधता नोंदवहया हया अचूक करणेबाबत सुचना दिल्या. लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना जिल्हा परिषदेशी संपर्क साधावा तसेच कोणत्याही अडचणीमुळे काम थांबणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या.मा. ए.डी. जाधव सदस्य महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,नागपूर यांनी लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना गावपातळीवर सर्वांचे एकमत असणे गरजेचे आहे. तसेच विविध प्रकारच्या जाती- व प्रजातीची नोंद नोंदवही मध्ये घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात त्यांचा व्यावसायिक दृष्टया वापर केल्यास स्वामित्व अधिकार असणा-या व्यक्ती अथवा संस्थेला 3 ते 5% हिस्सा मिळणार आहे, असे सांगतले.
मा.डॉ. शाम बाजेकल जैवविविधता तज्ञ मंडळ, पुणे यांनी जैवविविधता संदर्भात अन्नसाखळीचे महत्त्व सांगून त्याचा शाश्वत वापर कसा करता येईल.याबाबत मार्गदर्शन केले.जैवविविधता कायदयाची अंमलबजावणी राज्यापासून ग्रामपंचायत स्तरापर्यत होते याची माहिती दिली.मा.श्री. दौलत वाघमोडे जैवविविधता तज्ञ, मंडळ, पुणे यांनी लोक जैवविविधता नोंदवही कशी करावी याबाबत सविस्तर सादरीकरण केले.शाळा, महाविद्यालये शिक्षक विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, उत्स्फूर्तपणे येणारे स्वयंसेवकांना सहभागी करून लोक जैवविविधता नोंदवही तयार करावी असे सांगितले.सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केलेनंतर उपस्थित संस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंका- निरसन करणेत आले.लोक जैवविविधता नोंदवही तयार करताना कोणतीही अडचण आलेस जिल्हा स्तरावर तसेच पंचायत समिती स्तरावर सर्व प्रकारचे सहकार्य राहील. असे उपस्थित संस्थाना मा. भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी सांगितले. व उपस्थितांचे सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
जिल्हा परिषद कोल्हापूर