रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर,टिच टिम अंतर्गत जिल्हयातील 178 शाळांना पुस्तक वितरण सोहळा शाहू सभागृह, दसरा चौक ,कोल्हापूर या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.कुणाल खेमणार साहेब,प्रमूख पाहूण मा.अंबरिषसिंह घाटगे -सभापती ,अर्थ व शिक्षण समिती, जि.प.कोल्हापूर हे होते ता प्रमूख उपस्थित मा. सुभाष चौगुले,शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा .रविकिरण कुलकर्णी , मा.सचिन झ्ंवर, मा.शोभा तावडे या होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.कोल्हापूर यांनी रोटरीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविणेत येत असून जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जात आहे. मा.अंबरिषसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की , रु. 19.00 (लाख.) इतक्या मोठया प्रमाणात रोटरी मुव्हमेंट च्या माध्यमातून जि.प. शाळांना पुस्तके वितरण होत आहेत हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असेल. अशा पध्दत्तीचे सहकार्य रोटरी कडून या पुढे ही मिळाले तर कोल्हापूर हा देशातील शिक्षणाच्या बाबतीतील अग्रणी जिल्हा असेल
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर
रोटरीच्या माध्यमातून शाळा समृदृध करणेसाठी उचलेले हे विधायक काम असून जि.प.शाळांना ई.लर्निग ची सुविधा ,8000 शिक्षकांना तंत्रास्नेही प्रशिक्षण,MHM अंतर्गत डिस्पोजल मशीन ,वॉटर प्य्ुरीफाय इ.सुविधा पुरविणेत येत आहेत.पुढच्या काळात ही असेच रोटरीचे सहकार्य मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली. मा.शोभा तावडे यांनी प्रास्ताविक केले.व रविकिरण कुलकर्णी यांनी रोटरी बदृल माहिती दिली.