राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापण कार्यक्रम

सदर योजनेचा उददेश खालील प्रमाणे

  • स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे
  • एल.पी.जी.व इतर पांरपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे
  • एकात्मीक उर्जा धोरणात नमुद केल्यानुसार स्वंयपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे
  • रासायनीक खताचा वापर कमी करुन सेद्गीय खताचा वापर करण्यास लाभार्थिना प्रवृत करणे
  • ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.
  • बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे
  • कार्बनडायऑक्साइड आणि मिथेन यासारख्या वायूंचे वातावरणातील उत्सर्जनाचे प्रमाण घटवून वातावरण बदलांचे नियमन करणे
  • निसर्गातील वृक्ष तोडीस आळा घालून निसर्गाचा समतोल राखणे
  • बायोगॅस पासून विज निर्मीती करून कौटूबिक गरजा भगविणे.

इ. बाबी बायोगॅस उभारणीतून साधता येतात.

योजनेचे फायदे.:-

  • बायोगॅस सयंत्रामध्ये कुजवण्याची प्रकीया बंद जागेत होत असते तो वातावरणात पसरत नाही तर त्यापासुन गॅस निर्माण होतो व त्या वायुचे स्वयंपाकासाठी ज्वलंन होते व त्यातुन विषारी वायुचा नायनाट होतो त्यामुळे व प्रदुषण होत नाही.
  • बायोगॅस सयंत्रामधुन बाहेर पडणारी रबडी (स्लरी) म्हणजे शेतीसाठी लागणारे उकृष्ट दर्जाचे सेंद्गीय खत होय. त्यामुळे जमिनीची पोत सुधारते. व पिकांच्या उत्पादनातही वाढ होते.
  • घरगुती चुलीमुळे होणा-या धुरातील कार्बन डाय ऑक्साइड या विषारी वायुचे प्रदूषण होते तसेच महीलांच्या डोळयांसाठी सुध्दा अपायकारक आहे.हे आपल्याला बायोगॅसमुळे टाळता येते. स्वंयपाक कमी वेळेत करता येतो.
  • रिकाम्या जागेत केलेल्या मानवी व पशु विष्ठेमुळे हवेतील प्रदुषणामुळे व डासांमुळे कॉलरा , गॅस्ट्रो, मलेरिया, डेंगु इ. महाभयंकर रोगांचा फैलाव होतो. तो आपण सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे रोखु शकतो. व ग्रामीण भागातील जनता आरोग्यदायी होवुन गाव प्रदुषण मुक्त होते. म्हणजेच निर्मल गाव स्वच्छ व सुंदर बनते.
  • गोबरगॅससाठी शेंणाची गरज असल्यामुळे जनावरे पाळणे हे आवश्यक आहे. परंतु जनावरांमुळे आपल्याला शेंतीची मशागत व त्यांच्यापासुन मिळणारे दुधदुभते यामुळेही आर्थिक फायदा होतो.
  • घरगुती चुलीसाठी लाकडांचे जळन आवश्यक असते सर्वसाधारण पणे एका कुटूबांसाठी वर्षाकाठी एका वृक्षाचे लाकुड जळणासाठी लागते त्यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते परंतु बायोगॅस मुळे जंगल तोडीस आपोआपच आळा बसतो.
  • बायोगॅस योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे ग्रामीण भागागतील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मदत होते.

योजनेचा पात्र लाभार्थि

ग्रामीण भागातील ज्या लाभार्थिकडे स्वःताची जनावारे व बायोगॅस बांधकामासाठी जागा आहे तो सदर योजनेचा पात्र लाभार्थि आहे.
बायोगॅस बांधकाम केलेस मिळणारे अनुदान :-
ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केलेस केंद्ग शासनाचे नवीन आणि नवीकरणीय मंत्रालया मार्फत दिनांक ०७/०५/२०१४ पासून खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.

अ.न. सयंत्रची क्षमता घ.मी. बायोगॅस सयंत्रासाठी मिळणारे अनुदान रु. बायोगॅसला शौचालय जोडलेस मिळणारे अनुदान रु.
५५००/- १२००/- रु. प्रती सयंत्र
९०००/-

बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थिची अर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका कडूनकर्ज पुरवठा केला जातो व मिळणारी अनुदानाची रककम लाभार्थिचे कर्ज खाती जमा केली जाते. या शिवाय बायोगॅसचा स्वयपाकाव्यतीरीक्त इतर कारणासाठी वापर केलेस उदा.इतर उर्जा साधनांचा वापर कमी करुन डिझेल बचत करणे,जनरेटर,रेफ्रिजटेर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केलेस प्रति सयंत्रास ५००० रु. अनुदान देणेत येते .

सन १९८२-८३ ते २०१०-११ अखेर बायोगॅस योजना माहीती. ( जि.प.कोल्हापूर )

अ.न. वर्षे उदिष्ट साध्य शौचालय मागास खर्च अनुदान
१९८२-८३ ४०० १२९ १२० १३ ३१४०००
१९८३-८४ ४५० ५८१ ५७० ४८ १८५८०००
१९८४-८५ २००० २१५२ १८५० ७८ ७७९५०००
१९८५-८६ ३००० ४०८१ ३६२३ १३० १३७०००००
१९८६-८७ ३१०० ३१५७ २८५८ १७५ १२८४४०००
१९८७-८८ २५१० ४१९१ २८५३ १६६ १८७५४०००
१९८८-८९ १५०० ६३७५ २८३२ १९६ २६४८७०००
१९८९-९० १५०८ ४६३६ २०५० २७० १९१५२०००
१९९०-९१ ३००० ४२९३ १७९६ १७८ १६७२२०००
१० १९९१-९२ २५०० ३३०४ ११३३ १८० १३३६५०००
११ १९९२-९३ २५०० ४२१३ १३५६ १८५ १७४६३०००
१२ १९९३-९४ २००० २२७६ १००९ ११५ ७८९७००००
१३ १९९४-९५ १५०० २०५९ ८४० १०३ ६००००००
१४ १९९५-९६ १२०० १३११ ८६७ १०७ ३४६६०००
१५ १९९६-९७ ११०० १२९९ १११३ १४० ३९५०९००
१६ १९९७-९८ १५०० १५९० १४७२ ६९ ८८९७३४०
संस्था ५९७ ५९७ ५९७
१७ १९९८-९९ १२०० १३६७ १३१३ ६५ ७९७१४१०
संस्था ९५० ९५० ९५०
१८ १९९९-२००० १००० १४०८ १३८० ११ ७५७६६७५
संस्था १२०० १२०० १२००
१९ २०००-०१ १००० १११९ १०४७ २४ ७९२०७००
संस्था ९०० ९०० ९००
२० २००१-०२ १००० १२३९ ११८३ १४ ६१५५७५०
संस्था १०५० १०५० १०५०
२१ २००२-०३ ६५० ७४७ ७२५ १११ १०१९१७७१
संस्था १४५० १४५० १४५०
२२ २००३-०४ १४०० १६१४ १५८३ २३९ ५८७४१०५
२३ २००४-०५ १४१० १५८९ १५५९ १७४ ७६१०७००
२४ २००५-०६ २२०० २६३६ २५९८ ८४ १२६३३८००
२५ २००६-०७ ५२५२ ५२५२ ५१९४ १४६ २५१७४२००
२६ २००७-०८ ५३३० ७०३७ ६९८५ २०८ २५३९४६००
२७ २००८-०९ ८५०० ८५०० ८३९२ २६८ ४०७३८८००
२८ २००९-१० २४६० २४६० २४०० ८२ १७८३१५००
२९ २०१०-११ ५५०० ५५०३ ५३६९ १३१ ५९७०३४००
एकूण ७२८१७ ९२२६५ ७२२१७ ३७४४ ४८४५१५६५१

सदर योजना राबवित असताना सन १९८२ ते ८३ ते सन १९९८९९ अखेर देशात व राज्यात अनेक बक्षीस योजना राबविली जात असे व त्यात आपल्या जिल्हयास तसेच जिल्हा परिषदेस अनेक बक्षीसे मिळाली आहेत.

अक्र वर्ष देशात/राज्यात मिळालेला पुरस्कार रक्कम रूपये
सन १९८६-८७ राज्य पातळीवरप्रथम २५,०००/
सन १९८७-८८ राज्य पातळीवरप्रथम २५,०००/
सन १९८८-८९ देशपातळीवर  प्रथम १,५०,०००/
सन १९८९-९० देशपातळीवर प्रथम १,५०,०००/
सन १९९०-९१ देशपातळीवर प्रथम १,५०,०००/
राज्य पातळीवर तिसरा  ५,०००/*
सन १९९१-९२ देशपातळीवर  दुसरा १,००,०००/
सन १९९८-९९ राज्यपातळीवर प्रथम १२,०००/