मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. त्याच प्रमाणे मुख स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजरा पासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. मौखिक कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत ओळखला तर भविष्यात गंभीर कर्करोगात रुपांतर होण्यापासून रोखता येवू शकते. तंबाखू सेवन हे मुख कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
आरोग्य विभागा मार्फत दिनांक 1 डिसेंबर 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत मुख स्वास्थ्य तपासणी मोहिम राबविण्यात आली. कालावधीत जिल्हयातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची तपासणी करणेत आली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत 74 प्राथमिक आरोग्य केंद्र, 413 उपकेंद्रा मार्फत या कालावधीत मुख्य स्वास्थ्य तपासणी करण्यात आली. मोहिम कालावधीमध्ये एकुण 865681 इतक्या नागरिकांची मौखीक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या नागरिकां पैकी मद्य सेवन करणारे-60458 , तंबाखू/ सुपारी सेवन करणारे 116539 लोक आहेत. या कालाधीत तपासणी मध्ये मुख स्वास्थ्यकडे दुर्लक्ष होत असलेचे दिसून येते. तोंड उघडता न येणारे 399 रुग्ण आहेत. पांढरा/लाल चट्टा – 794 , त्वचा जाडसर असणा-यांची संख्या – 205 , पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस बरा न होणारा ब्रण 39 रुग्ण आहेत. एकुण 1280 रुग्णांना तपासणी अंती संदर्भित केले आहे. तपसणी मध्ये धोक्याचे लक्षणे आढळणा-या रुग्णांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य शिक्षण देण्यात आले.
या मोहिमे मध्ये जिल्हया परिषदेच्या मुख्यालयातील तपासणीसाठी मा. डॉ कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी , डॉ प्रकाश पाटील जि.आ.अ व सर्व अधिकारी , कर्मचारी यांनी तपासणी करुन घेतली. उदघाटन कार्यकमास डॉ हरिष जगताप, प्रकल्प संचालक, डॉ एल.एल. पाटील जिल्हा शल्यचिकित्स, डॉ उषादेवी कुंभार, प्र अति. जि.आ.अ, उपस्थित होते. प्रसिध्द कॅन्सर रोग तज्ञ डॉ सुरज पवार यांनी कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले. डॉ देसाई, प्र. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.