महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी केलेबाबत.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १२/०३/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. डॉ. कुणाल खेमनार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या आठवणी सांगितल्या. मा. इंद्रजित देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व  असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे प्रशासनामध्ये अनुकरण करावे असे सांगितले. माजी उपाध्यक्ष मा. धैर्यशील माने यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षण सभापती मा. अमरिशदादा घाटगे यांच्या उपस्थितीत श्री. उदय कारंडे वरिष्ठ सहाय्यक व श्रीमती प्रतिमा पाटील कनिष्ठ सहाय्यक यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

मा. डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक (डीआरडीए), मा. श्री. राजेंद्र भालेराव      उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. किरण लोहार शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री. राहुल कदम उप मुख्य लेखाधिकारी, श्री. चंद्रकांत सुर्यवंशी जिल्हा कृषि अधिकारी, डॉ. संजय शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर