*महापुरानंतर स्वच्छते साठी नृसिंहवाडी येथे जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता श्रमदान*

जिल्ह्यातील महापूर ओसरला असून पुर बाधित सर्व गावांमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत याच पार्श्वभूमीवर आज ग्राम पंचायत नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथे मा. श्री. संजयसिंह चव्हाण, मुख्य  कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यांवर साचलेला गाळ उपसण्यासाठी श्रमदान केले.  
          या श्रमदानासाठी जिल्हास्तरावरून मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन , जि.प.कोल्हापूर, मा.श्री. अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं) जि.प.कोल्हापूर, मा.श्री राहूल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि .प. कोल्हापूर , तसेच पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
      तालुका स्तरावरून मा.श्री. एस. एस. कवितके , गटविकास अधिकारी, शिरोळ व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्राम पंचायत नृसिंहवाडीच्या सरपंच मा. सौ. पार्वती कुंभार, सामाजिक कार्यकर्ते श्री. दादेपाशा पटेल, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेवक तसेच सर्व ग्राम पंचायत  कर्मचारी व ग्रामस्थ यांनी श्रमदानातून गाळ काढण्याचे काम केले. या श्रमदानासाठी शेजारील गावातून मजूर घेण्यात आले होते. सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झाली होती.