पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर  यांचे श्रमदान

स्वच्छता ही सेवा’ व  नमामि पंचगंगे  उपक्रमांतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती करीता करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यातील  गावांमध्ये जनजागृती उपक्रम आणि श्रमदानाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी आज रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्राम पंचायत शिरोली पु. व तिळवणी ü या गावांमध्ये आज प्रत्यक्ष श्रमदानास सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये विविध श्रमदान आधारित उपक्रम काम हाती घेण्यात आले असून मा. सौ. शौमिका महाडीक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ग्राम पंचायत शिरोली पु. येथे स्वत: उपस्थित राहून  श्रमदान केले.

या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम ग्राम पंचायत शिरोली पु. येथे मा.अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर व उपस्थितांकडून नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर सांडपाणी वाहून नेणा-या ओढयावर बंधारा घालण्यात आला.

या श्रमदानासाठी मा. सौ. शौमिका महाडीक अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा.श्रीम. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा.व स्व.), जि.प.कोल्हापूर, मा.डॉ. सोनाली पाटील, पं.स. सदस्य, मा.श्री.उत्तम सावंत, पं.स. सदस्य, हातकणंगले, मा.श्री. अरविंद धरणगुत्तीकर, गट विकास अधिकारी, पं. स. हातकणंगले, मा.श्री. शशिकांत खवरे, सरपंच, ग्रा. पं. शिरोली पु. यांनी उपस्थित राहून श्रमदान केले.

यानंतर ग्राम पंचायत तिळवणी येथे देखील श्रमदान मोहिम राबविण्यात आली. यावेळी नदी काठच्या परिसराची स्वच्छता करून तेथे वृक्षारोपणाचे काम करण्यात आले.या दोन ही गावांमध्ये ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, बचतगट प्रतिनिधी, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

सोबत – उपक्रमाचे निवडक छायाचित्र.

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर