नावीन्यपूर्ण उपक्रम

शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम

राजर्षि शाहू शिक्षण समृध्दी उपक्रम

ज्ञानरचनावादी शाळा

नवोपक्रम अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांसाठी संगणक शिक्षण.

ISO मानांकित शाळा.

ई-लर्निंग / डिजीटल शाळा.

जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित राजर्षि शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला.

राजर्षि शाहू शिक्षण समृध्दी उपक्रम

उद्देश : –

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा प्रयत्न करणे

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाजाचा सहभाग वाढवून शाळा लोकाभिमुख करणे.

भारतीय सणांचे शास्त्रीय महत्व पटवून देणे तसेच राष्ट्र पुरुषांची जयंती / पुण्यतिथी साजरी करणे.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा स्पर्धां व सेहसंमेलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्य व कलागुणांना वाव देणे.

राजर्षि शाहू शिक्षण समृध्दी उपक्रमाकरिता सन 2015-16 च्या जि. प. स्वनिधीमध्ये रु. 100.00 लक्ष इतकी अर्थिक तरतूद

फलनिष्पती : –

गडहिंग्लज, कागल व गगाबावडा या तीन गटातील 100% शाळा ज्ञानरचनावादी.

जि. प.च्या एकूण 2004 पैकी 1466 शाळांमध्ये ज्ञानरचनावादाची यशस्वी अंमलबजावणी.

ज्ञानरचनावादी शाळांच्या निर्मितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व समाजाचा सक्रीय सहभाग

अप्रगत विद्यार्थीविहीन शाळा, तालुका, जिल्हा व महाराष्ट्र निर्मितीचे उद्दिष्ट दृष्टीक्षेपात

कृतियुक्त अध्ययन पध्दती (ABL)

उद्देश : –

कृतीयुक्त अध्ययानद्वारे आंनददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करणे.

विद्यार्थी केंद्रीत अध्ययन प्रक्रीयेची अमंलबजावणी.

प्रत्येक क्षमतेचे छोट्या कृतीमध्ये रुपांतर होण्यास मदत.

प्रत्येक विद्यार्थ्यांला अध्ययन सामग्री प्रदान तसेच सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन

ABL शाळा निर्मितींकरिता सन 2014-15 मध्ये जि. प. स्वनिधीमध्ये रु. 75.00 लक्ष इतका खर्च.

फलनिष्पती : – –

उद्देश : –

जिल्हा परिषदेच्या शाळा ISO मानांकित होणेसाठी प्रयत्न करणे. .

ISO मानांकानाद्वारे शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढीस मदत करणे.

शाळानां आवश्यक सर्व भौतिक सुविधांची निर्मिती करणे.

फलनिष्पती : –

सन 2015-16 मध्ये जिल्हा परिषदेच्या 30 शाळांना ISO मानांकन प्राप्त.

ISO मानांकनासाठी शासनाकडून आथिर्क तरतूद नसतानाही शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व लोकसहभागातून भरीव आर्थिक सहकार्य.

ई-लर्निंग / डिजीटल शाळा

उद्देश : –

विविध विषयातील घटक, संबोध व संकल्पनांचे सुलभीकरण करणे.

अध्ययन-अध्यापनात सचेतना आणणे.

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी व आनंददायी बनविणे.

सन 2015-16 च्या जि. प. स्वनिधीमध्ये ई-लर्निग करीता रु. 75.00 लक्ष अर्थिक तरतूद फलनिष्पती : –

जिल्हा परिषदेच्या एकूण 195 शाळांमध्ये लोकसहभागातून ई-लर्निंग सुरु.

जिल्हा परिषदेच्या एकूण 2004 शाळांपैकी 896 डिजीटल शाळा.

CSR अंतर्गत 3 खाजगी संस्थांकडून रु. 22.00 लक्ष किंमतीचे ई-लर्निंग संच पुरवठा.

जिल्हा परिषदेच्या एकूण 159 शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत संगणक प्रयोगशाळा उपलब्ध.

जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित राजर्षि शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला

कोल्हापूर जिल्हा परिषदेची राजर्षि शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला जून 2014 पासून शिंगणापूर ता. करवीर येथे सुरु.

भारतातील एकमेव जिल्हा परिषदेची निवासी क्रीडा प्रशाला.

मोफत शिक्षणाच्या हक्कासोबत खेळण्याचा सुध्दा मूलभूत हक्क प्रदान.

मुलांच्या अंगभूत क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने नाविन्यपुर्ण उपक्रम.

शैक्षणिक सुविधा

शालेय गणवेश, वहया, पुस्तके, शैक्षणिक साहित्य मोफत..

क्रीडा प्रशिक्षणार्थी स्पर्धेसाठी, शिबीरासाठी बाहेर गावी गेल्यानंतर त्यांचा शालेय अभ्यासक्रम सुध्दा इतर वेळेमध्ये पुर्ण करुन घेण्याची व्यवस्था.

निवासी सुविधा

मुलानां व मुलींना स्वतंत्र व सर्व सोयींनी युक्त वस्तीगृहाची व्यवस्था

वसतीगृहामध्ये प्रथमोपचार व आवश्यकेानुसार वैद्यकिय सुविधेची व्यवस्था.

आहारतज्ञांच्या सल्यानुसार खेळाडूना संतुलित आहाराची व्यवस्था.

क्रीडा विषयक सुविधा

ज्या त्या खेळातील तज्ञ प्रशिक्षकांची सोय. प्रत्येक खेळासाठी दोन प्रशिक्षक व एक सहाय्यक नियुक्त.

वेळोवेळी बदलत्या क्रीडा प्रशिक्षणातील प्रणालीनुसार प्रशिक्षकांचे जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षणाची व्यवस्था.

तंबाखुमूक्त शैक्षणिक संस्थाचे 11 निकष

1)तंबाखुमूक्त पदार्थाचे सेवन करणेस बंदी असणे.

2)धूम्रपान निषिद्‌ध क्षेत्र फलकाचा फोटो असणे.

3)तंबाखुचे दुष्परिणाम असणे व पोस्टर / घोषणा / नियम लावणे. .

4)मुख्याध्यापकांचेकडे तंबाखु नियंत्रण कायदा 2003 व अध्यादेशाची प्रत असणे.

5)100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असणे व फलक लावणे. .

6)शालेय आरोग्य उपक्रमात तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश असणे. .

7)तंबाखु नियंत्रणासाठी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा गौरव करणे. .

8)तंबाखु नियंत्रणासाठी नियुक्त राज्य प्रतिनिधी / तालुका वैद्यकीय अधिकारी यांची मदत घेणे. .

9)तंबाखुविरोधी संदेश स्टेशनरीवर चिटकविणे.

10)तंबाखु नियंत्रण समितीची स्थापना करुन त्रैमासिक बैठका घेणे.

11)तंबाखुमूक्त शाळा / संस्था असा फलक लावणे.

सन 2013-14 ते 2015-16 मध्ये पुढीलप्रमाणे तंबाखूमुक्त शाळा घोषित झालेल्या शाळांची यादी – .

ता. आजरा :- 1) वि.मं. देवकांडगांव, 2) वि.मं. झुलपेवाडी, 3) वि.मं. हाजगोळी बुद्रुक,

4) वि.मं. सरंबळवाडी, 5) वि.मं. बहिरेवाडी, 6) वि.मं. हरपवडे

ता. करवीर :-1) वि.मं. हसुर दुमाला, 2) वि.मं. परिते, 3) वि.मं. सोनाळी,

4) वि.मं. म्हालसवडे, 5) वि.मं. पाटेकरवाडी, 6) वि.मं. बाचणी,

7) वि.मं. कारभारवाडी, 8) वि.मं. आरे, 9) वि.मं. देऊळवाडी,

10) वि.मं. खुपिरे, 11) वि.मं. वाकरे

. हातकणंगले :- 1) संजीवन वि.मं. चंदूर, 2) जनता प्राथ. विद्यालय रेंदाळ,

ता. आजरा :-1) वि.मं. देवकांडगांव, 2) वि.मं. झुलपेवाडी, 3) वि.मं. हाजगोळी बुद्रुक,

3) वि.मं. इंगळी,

ता. कागल :-1) वि.मं. केनवडे