जैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन आज रोजी ग्रामपंचायत जैनापूर, ता. शिरोळ येथे सांडपाणी प्रकल्पाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या प्रकल्पाचे उदघाटन मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष जि. प. कोल्हापूर, यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. राजवर्धन नाईक-निंबाळकर, सदस्य जि. प. कोल्हापूर, मा.हेमंत कोलेकर सदस्य जि. प. कोल्हापूर,मा. सौ . राणी खमलेट्टी, सदस्य जि. प. कोल्हापूर, मा. प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) जि. प. कोल्हापूर यांची उपस्थिती होती.
या प्रकल्पामुळे जैनापूर या गावाची सांडपाण्याची समस्या कायमची सुटली आहे. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे त्यामुळे गावात सांडपाण्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते. या सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेसाठी निर्माण होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी वापरणेचे काम हाती घेण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन करणेचा प्रस्ताव राबविणेत आला. या प्रकल्पांतर्गत ३ स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तीन स्थिरीकरण तळ्यातून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.
या उदघाटन कार्यक्रमास मा. श्री. राम शिंदे, मा. सौ. अर्चना चौगले, सभापती, पंचायत समिती शिरोळ, मा. श्री. संजय माने, उपसभापती, प.स. शिरोळ , मा. श्री. सुरेश कांबळे, सदस्य प.स. शिरोळ, मा. राजगोंड पाटील, सदस्य प.स. शिरोळ मा. विजयसिह जाधव, गटविकास अधिकारी, प.स. शिरोळ , मा. श्री. साठे, उपअभियंता, ग्रा.प.पु. शिरोळ, जैनापूर गावचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.