जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वनिधी विधवा परितक्त्या व दारीद्रय रेषेखालील महिलांना 20 तलंगा गट वाटप करणे या योजनेअंतर्गत 12 आठवडयाच्या तलंगा खरेदी करण्यात येणार आहेत.
आपले कमीत कमी दराचे 12 आठवडयाच्या देशी / देशी सुधारीत जातीच्या तलंगांचे दरपत्रक प्रतिनग सर्व करांसहित दि. 16/01/2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने लिफाफा सिलबंद करुन या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.
कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणेचा अधिकार राखुन ठेवणेत आलेला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर.