जिल्हा परिषद योजना

  • विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा
  • अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धा
  • स्काऊट गाई ड मेळावा
  • शिक्षकासाठी सांस्कृतिक स्पर्धा
  • आदर्श शाळा पुरस्कार
  • शिक्षक दिन (शिक्षकांना पुरस्कार देणे)
  • प्राथमिक शाळांना क्रिडा /सांस्कृतिक व व्यायाम साहित्य पुरविणे
  • प्राथमिक शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविणे
  • प्राथमिक शाळांना बेंच पुरविणे
  • १ लीच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र पुरविणे
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना / परीक्षेसाठी उपयोगी पडणारी पुस्तके पुरविणे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात आनुग्रह अनुदान योजना :-

शासन निर्णया क्रमांक पीआरई २०११/प्र.क्र.२४९/प्राशि-१, दि. ११ जुलै २०११ नुसार २७ ऑगस्ट २०१० पासून घडलेल्या घटनांना लाभ देवू शकतो. ज्या द्यार्थ्यांस कायम अपंगत्व व मृत्यू झाला असल्यास या योजनेतून लाभ देवू शकतो. एक अवयव निकामी रु. ३००००/- दोन अवयव निकामी रु.५००००/- व मृत्यू झाल्यास रु.७५०००/- इतका भरपाई देवू शकतो.

अल्पसंख्याक मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजना :-

शासन निर्णय क्र.प्रपंका २००९ (८९/०९) असंस दि. ३० जून २००९ नुसार अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. केंद्ग शासनाने जाहिर केल्याप्रमाणे मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारसी या समाजातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होतो. मंजूर शिष्यवृत्तीधारकास वार्षिक रु.१०००/-इतकी रक्कम दिली जाते.

अल्पसंख्याक उपस्थिती भत्ता / प्रोत्साहनपर भत्ता योजना :-

शासन निर्णय क्र.असंस-२००९ प्र.क्र३७/कार्या-१, दि. ५ फेब्रुवारी २००९ नुसार अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासन मान्य वरिष्ठ प्राथमिक शाळेतील इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक (मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन व पारसी) समाजातील विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी व उपस्थितींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून शासन मान्य सर्व शासकीय तसेच खाजगी अनुदानित, विनाअनुदानित (कायम विना अनुदानित शाळा वगळून) इ. ५ वी ते ७ वी मध्ये नियमित उपस्थित राहणार्याय विद्यार्थ्यांच्या पालकांना रु.२/- प्रति दिवस देण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. सदरहू विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ७५% पेक्षा जास्त उपस्थिती असणे आवश्यक आहे. सदरहू प्रोत्साहन भत्ता जास्तीत जास्त २२० दिवसासाठी देय राहील.

अल्पसंख्याक गणवेष वाटप योजना :-

शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभाग क्र.असंस/२००९/प्र.क्र.३६/का-१, दि. २४/०२/२००९ नुसार शासन मान्य प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व शासकी / खाजगी अनुदानित व विनाअनुदानित (कायम विना अनुदानित शाळा वगळून) प्राथमिक शाळेतील अल्पसंख्याक समाजातील (मुस्मील, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन व पारसी) समाजातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करणेकामी प्रति विद्यार्थी रु.२००/- प्रमाणे मंजूरी दिलेली आहे.