सर्व शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अस्थिव्यंग, बहुविकलांग, सीपी, मतिमंद, अंध, कर्णबधिर इ. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य साधने व उपकरणे देण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबीर दिनांक 28/09/2017 ते 03/10/2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दैनंदिन क्रिया व अध्ययन प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने सदर साहित्य साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. मोजमाप शिबिराचे आयोजन शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत करणेत आले होते.
आबासाहेब सासने विद्यालय, कोल्हापूर येथे दि. 28/09/2017 व दि.29/09/2017 रोजी कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा, करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ व शाहूवाडी या गटाकडील दिव्यांग विद्यार्थ्याकरिता आयोजन करण्यात आले होते. दि. 01/10/2017 रोजी प.बा. पाटील, हाय. व ज्युनि. कॉलेज मुदाळ, ता.भुदरगड येथे कागल, भुदरगड व राधानगरी या गटाकडीलकरिता व चंदगड, आजरा व गडहिंग्लज गटाकडील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिनांक 03/10/2017 शिवशक्ती हायस्कूल, अडकूर ता. चंदगड येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबीरास मा. हसीना फरास महापौर कोल्हापूर महानगरपालिका, मा. सौ. वनिता देठे, मा. श्री. डी. एस. पोवार, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूरए मा. श्री. सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. कोल्हापूर, डॉ.जी.बी. कमळकर, गटशिक्षणाधिकारी, पं.स. कागल यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेकडील 403 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने निश्चित करण्यात आलेली आहेत ती पुढीलप्रमाणे- एम आर किट-403, सी पी चेअर-73, व्हिलचेअर-59, रोलेटर-29, ब्रेल किट-3, श्रवणयंत्र-67, क्रचेस-7, कॅलिपर-60, डायसी प्लेअर-18, स्मार्ट केन-3, एल्बो क्रचेस-3, ट्रायसिकल-4, , जयपूर फुट-1 अशी एकूण 475 साहित्य साधने निश्चित करणेत आली.
मोजमाप शिबिरकरिता अलिम्को, जबलपूरचे श्री. विक्रम महाराणा, श्री.अंशुमन परिडा, श्री. ओमप्रकाश व श्री. किशनकुमार, डॉ. चेतन जगताप फिजिओथेरपिस्ट व श्री. सचिन पाटील सायकॉलाजीस्ट तसेच RBSK पथकातील डॉक्टर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सर्व तज्ञानी मिळून दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने निश्चित करणेत आली आहेत. पालकांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद कोल्हापूर