ग्रामविकास विभागाकडील जाक्रं झेडपीए 2018/प्रक्रं 145/पंरा 1दिनांक 28 जानेवारी 2019 च्या प्राप्त पत्रानुसार केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार 2019 अंतर्गत (तपासणी वर्ष 2017-18) जिल्हा परिषदेने केंद्रस्तरावर ऑनलाईन् प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद कोल्हापूरची मा. श्री श्रीनिवास बावा व श्री अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाकडुन दि. 07-02-2019 ते 09-02-2019 अखेर जिल्हा परिषदेची कागदपत्रांची व क्षेत्र स्तरावरील प्रत्यक्ष पडताळणी करणेत आलेली होती. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बाबी, सभा कामकाज, सभा कामाकाजाचे रेकॉर्ड, जि.प. सदस्य यांची सभेस उपस्थिती इ. सह जिल्हा परिषदेकडील योजना व जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती याची पडताळणी करणेत आली होती.जि. प. च्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव, पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे , स्वच्छ भारत मिशन, डिजीटल शाळा, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, शिंगणापुर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड सॉर्टींग अंतर्गत् डिजीटल रेकॉर्ड रुम, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस, आधारवड, कॅन्सर सर्व्हेक्षण, महिला बचत गटांचे काम, घरकुल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, वॉटर एटीएम, आयएसओ पशुसंवर्धन दवाखाने तसेच शिगणापुंर निवासी क्रिडा प्रशाला, रेकॉर्ड सॉर्टींग अंतर्गत् डिजीटल रेकॉर्ड रुम इ. डॉक्युमेंटरी यांचे सादरीकरण करणेत आलेले होते.
पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 चा निकाल केंद्र शासनाकडील दिनांक 16-09-2019 च्या पत्रान्वये नुकताच जाहिर झाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सादर केलेल्या नामांकनास राज्यामध्ये प्रथम पारितोषिक (प्रमाणपत्र व रक्कम रुपये 30 लाख या स्वरुपात) मिळाले आहे.
यासाठी जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष सौ. शौमिका अमल महाडिक, मा. उपाध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, श्री अंबरिषसिंह घाटगे सभापती अर्थ व शिक्षण समिती , श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर सभापती आरोग्य व बांधकाम समिती, श्री विशांत महापुरे सभापती समाजकल्याण समिती, सौ वंदना मगदुम सभापती महिला व बालकल्याण समिती, गटनेते श्री अरुणराव इंगवले, पक्षप्रतोद श्री विजय भोजे व सर्व सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवि शिवदास, प्रकल्प संचालक अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत अडसूळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सर्व खातेप्रमुख व त्यांचा कर्मचारी वर्ग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांक प्राप्त होण्यास सहभाग लाभला.
या पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेस पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रथम पारितोषिक सन 2014-2015 मध्ये मिळाला होता.