किशोरवयीन मुली आणि पॅडमॅन – ज़िल्हा परिषदेचा उपक्रम

जिल्हा परिषदेमार्फत किशोरवयीन मुलींना पॅडमॅन चित्रपट शेा चे आयोजन

 (जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 535 मुलींनी  पाहीला चित्रपट)

 

मासिक पाळी व्यवस्थापन हा महिलांच्या,किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अद्याप ही या विषयाबाबत आपल्या समाजात खुलेपणाने बोलले जात नाही .या विषयाची जाणीव जागृती व्हावी  तसेच वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत जागृती व्हावी या उदद्ेशाने शासनाकडून सर्व जिल्हयामध्ये पॅडमॅन हा चित्रपट दाखविला जात आहे.त्यानूसार कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत मा.सौ.शौमिका महाडीक,अध्यक्षा,जि.प.कोल्हापूर आणि मा.डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट आज  जि.प. शाळांमधील किशोरवयीन मुलींना दाखविण्यात आला.

महिलांचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे.असे मत मुलींना मार्गदर्शन करताना मा.अध्यक्षा यांनी मांडले.

या फिल्म शो दाखविण्याचा उदद्ेश स्पष्ट करताना मा.श्रीम.सुषमा देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.),जि.प.कोल्हापूर म्हणाल्या की,मुली वयात येताना त्यांच्यात शारिरीक,मानसिक बदल होत असतात तसेच या काळात वैयक्तिक स्वच्छता महत्वाची असते आणि यासाठी शासनाने अस्मिता योजनेअंतर्गत या मुलींना माफक दरात सॅनिटरी पॅडची उपलब्ध केली आहे.या तीन बाबी मुलींपर्यंत पोहचणेस ही फिल्म मार्गदर्शक ठरेल.

यावेळी उपस्थित  शिक्षण व अर्थ समिती चे सभापती मा.श्री.अंबरिश घाटगे,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मा.सौ.शुभांगी शिंदे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख यांचे आभार मा.श्री.सुभाष चौगले,शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांनी मानले.

या फिल्म शो साठी उपस्थित जिल्हयातील 535 मुलींनी हा चित्रपट पाहिला.जिल्हा शिक्षण बँकेमार्फत श्री.रेपे सर यांनी सर्व मुलींना अल्पोपहार उपलब्ध करून दिला .तसेच आयनॉक्स थिएटरचे व्यवस्थापक श्री.भिसे यांनी या शो चे व्यवस्थापन केले.या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तसेच शिक्षण विभाग (प्रा.)यांनी केले .

———————————————————————————-

 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.)

जिल्हा परिषद,कोल्हापूर