जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग
जाहीरात
जिल्हा परिषद कोल्हापूर स्वमालकीच्या जागा मिळकतींचा व्यापारी तत्वावर विकसित करणे या विवक्षित कामाकरिता करार पध्दतीने मालमत्ता विकास अधिकारी यांची नेमणूक करणेत येणार आहे. त्याकरिता सेवानिवृत्त शासकीय अभियंता यांचेकडून अर्ज मागविणेत येत असून प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची निवड करुन नामिकासूची (PANEL) तयार करणेत येऊन नामिकासूचीतील व्यक्तींमधूनच करार पध्दतीने नियुक्ती करणेत येणार आहे.
अ.क्रं. | पदनाम | नामिकासूचीतील व्यक्तींची संख्या | पारिश्रामिकाची एकत्रित रक्कम (सर्व भत्त्यांसह) |
1 |
मालमत्ता विकास अधिकारी
|
05 |
रु.40,000/- दरमहा |
मालमत्ता विकास अधिकारी नेमणूक बाबतची जाहिरात सूचना नमुना अर्ज व अटी/शर्तीसह “www.zpkolhapur.gov.in”µÖÖ संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
सही/- सही/- सही/-
कार्यकारी अभियंता(बांधकाम) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर
करार पध्दतीने मालमत्ता विकास अधिकारी यांची नेमणूक करणे
कामाचे स्वरुप :-
- जि.प.च्या मालमत्ता जि.प.च्या नावे करण्याबाबत पाठपुरावा करणे.
- जि.प.मालकीच्या मालमत्ता व्यापारी तत्वावर विकसित करणे.
- जि.प.च्या उत्पन्नवाढीच्या पर्यायावर (उदा.बँकेचे ATM बसविणे, जाहिरात फलक, दुकानगाळे, पार्किंग इत्यादी)
- जि.प.ची रेस्टहाऊस व्यावसायीक तत्वावर विकसित करणे.
नियम व अटी :-
- कामासाठी आवश्यक असणारी विशेष अर्हता (शासकीय सेवेतील उप अभियंता या पदावर किमान 3 वर्षाचा अनुभव) अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अ) शासकीय सेवेतून सार्वजनिक बांधकाम कडील आस्थापनेवरुन उप अभियंता (स्थापत्य) या
पदावरील सेवानिवृत्त अधिकारी. (सेवानिवृत्तीच्या आदेशाची झेरॉक्स सत्य प्रत जोडणे
आवश्यक)
ब) शासकीय सेवेचा किमान 25 वर्षाचा अनुभव. (सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
सत्यप्रत जोडणे आवश्यक)
- अर्जदार व्यक्तीची कमाल वयोमर्यादा 61 वर्षे पूर्ण इतकी राहील.
- करार पध्दतीने नियुक्ती करणेत यावयाची व्यक्ती शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावी तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. (जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला आवश्यक आहे)
- करार पध्दतीने नियुक्ती करणेत यावयाच्या व्यक्ती विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणाची कोणतीही शिक्षा झालेली नसावी. (सा.बां.विभागाकडील प्रमाणपत्राची झेरॉक्स सत्यप्रत जोडणे आवश्यक).
- नियुक्ती ही एकावेळी जास्तीत जास्त एक वर्षासाठी देण्यात येईल. मात्र आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीकरीता दरवर्षी नुतनीकरण करणेत येईल. मात्र एकूण कालावधी हा तीन वर्षापेक्षा अधिक असणार नाही.
- नियुक्ती ही केवळ विवक्षित कामासाठीच करणेत आली असून नियमित स्वरुपाच्या कामकाजाचा समावेश असणार नाही.
- नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधिताची राहील या आशयाचे बंधपत्र/हमीपत्र देणे आवश्यक आहे. तसेच नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गंुतलेला नसावा.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गंुतलेले हितसंबंध जाहिर करणे आवश्यक आहे.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/माहिती व आधारसामुग्री बाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या कामकाजाबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी वेळोवेळी बोलावलेल्या आढावा बैठकीस उपस्थित राहून अहवाल सादर करतील. तसेच मा.मु.का.अ. यांनी घेतलेल्या निर्णयाची अंम्मलबजावणी करणे बंधनकारक राहील.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार असणार नाहीत.
- शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्ती, समितीने वेळोवेळी निश्चित केलेल्या अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
- नियुक्तीसाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना विशेष परिस्थितीत किंवा कामगिरी समाधानकारक न आढळल्यास कोणत्याही वेळी करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीची सेवा करारपत्राची मुदत संपणेपूर्वी समाप्त करण्याचे अधिकार राहतील व त्याबाबत संबंधितास कोणत्याही स्वरुपाची व कसलीही तक्रार करता येणार नाही. तसेच कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही.
- अर्ज कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून स्वहस्ते पाठविण्याची अंतिम मुदत दिनांक 04 / 10 / 2017 अखेर राहील. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.
- अपूर्ण / चुकीचे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकारणे अथवा नाकारणेचे अधिकार सर्वस्वी कमिटीचे राहतील.याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.
सही/- सही/- सही/-
कार्यकारी अभियंता(बांधकाम) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर
अर्जाचा नमुना
प्रति,
मे. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद कोल्हापूर.
विषय :- करार पध्दतीने मालमत्ता विकास अधिकारी यांची नेमणूक मिळणे बाबत.
अर्जदाराचे संपूर्ण नांव :- ——————————————————-
व पत्ता ——————————————————-
——————————————————-
जन्म दिनांक :-
नोकरी सुरु दिनांक :-
सेवानिवृत्त दिनांक :-
शैक्षणिक अर्हता :-
सेवानिवृत्त वेळी धारण ü :-
केलेले पद.
सेवा कालावधी मध्ये उपभोगलेली पदे व कालावधी
कार्यालयाचे नांव | धारण केलेले पद | कालावधी | ||
पासून | पर्यंत | वर्ष – महिने | ||
ठिकाण :-
दिनांक :-
अर्जदाराची सही :- —————————–
अर्जदाराचे नांव :- ———————————
अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्रांची यादी :-
1)
2)
3)
4)