एकात्मिक बाल विकास सेवा योजना

    • आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.
    • आयसीडीएस कार्यक्रम २ ऑक्टोबर १९७५ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १०६ व्या जयंती दिनी सुरु करण्यात आला आहे.

  • आयसीडीएस कार्यक्रम प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे. ज्यामध्ये मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणा-या ६ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदामाता आणि किशोरीसाठी एकत्रित सेवा दिल्या जातात.
  • बालकांची काळजी, शारीरीक व मानसिक विकास तसेच आरोग्य व पोषण यासंबधीच्या गरजा एक दुस-यावर अवलंबून आहेत आणि या एकमेकाला पुरक आहेत या सिध्दांतावर आयसीडीएसचा दृष्टीकोन आधारीत आहे.
  • आयसीडीएस समाजावर आधारीत कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी समाजातील सदस्य जसे की, पंचायत राज, महिला मंडळ, युवा मंडळ, स्वंयसेवी संस्था, शिक्षक इत्यादींचे सक्रिय योगदान घेणे आवश्यक आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची उद्धीष्टे

  • बालकांच्या योग्य मानसिक, शारिरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे.
  • सहा वर्षाखालील वयाच्या बालकांचे पोषण व आरोग्य स्थिती मध्ये सुधारणा घडवून आणणे.
  • बालमृत्यु, कुपोषण आणि शाळा सोडणार्या बालकांच्या संख्येत घट घडवुन आणणे.
  • बालविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे
  • योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहिल याबाबतच्या आवश्यकते बाबतची काळजी घेण्यासाठी मातां¬ना सक्षम व योग्य बनविणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ६ वर्षाखालील मुलांचे पोषण व आरोग्यस्थिती सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी १) लसीकरण २) आरोग्य तपासणी ३) संदर्भ सेवा ४) पुरक पोषण आहार ५) पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील महिलांना आरोग्य व पोषण शिक्षण ६) तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण (अनौपचारीक शिक्षण) इत्यादी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे लाभार्थी व पुरविण्यात येणार्‍या सेवा

तीन वर्षापेक्षा कमी वयाची बालके ३-६ वर्षाची बालके गर्भवती व स्तनदामाता १५-४५ वर्षाच्या अन्य महिला ११-१८ वर्षाच्या किशोरी
१) पुरक पोषण आहार १) पुरक पोषण आहार १) आरोग्य तपासणी १) पोषण व आरोग्य.शिक्षण १) पुरक पोषण आहार
२) लसीकरण २) लसीकरण २) गर्भवती महिलेला . टिटॅनसची लस टोचणे २) लोहयुक्त व जंतनाशक . गोळया
३) आरोग्य तपासणी ३) आरोग्य तपासणी ३) पुरक पोषण आहार ३) आरोग्य तपासणी
४) वाढीवर देखरेख ४) वाढीवर देखरेख ४) पोषण व आरोग्य . शिक्षण ४) हिमोग्लोबीन () व . बॉडीमास इंडेक्स () तपासणी
५) संदर्भ सेवा ५) संदर्भ सेवा ५) प्रशिक्षणः-
अ) आरोग्य व स्वच्छता
ब)  पोषण व आहार
क)  जीवन कौशल्य
ड)  व्यवसायिक प्रशिक्षण
इ)  अभ्यासदौरा
६) अनौपचारिक पूर्व – शालेय शिक्षण

कोल्हापूर जिल्हयामध्ये ३७१६ अंगणवाडी केंद्रातुन २७८ मिनी अंगणवाडी केंद्रातुन लाभ देण्यात येणा-या लाभार्थींची माहिती

एकात्मिक बाल विकास योजना जिल्ला कक्ष सर्वसाधारण माहिती