FaceBook Like

RTE अंतर्गत २५ % विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2018-19 – दुसरी फेरी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विद्यार्थी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 599 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविणेत आले होते. दि. 13/04/2018 इ. रोजी पहिली फेरी समाप्त झालेली असून पहिल्या फेरीअंती एकूण 448 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. 118 विद्यार्थी अपात्र ठरले असून 33 विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही.

दि. 18/04/2018 इ. रोजी विद्यार्थी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार असून ऑनलाईन प्रणालीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत येणार आहे. सदर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविले जातील. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दि. 20/04/2018 ते दि. 10/05/2018 या कालावधीत संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. दुस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशासाठी अंतिम तारीख 10/05/2018 आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले यांनी केले आहे.

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
July
SMTuWThFS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
अभ्यागत
13,169