FaceBook Like

गरोदर माता, तिव्र – मध्यम कुपोषीत बालके व विकलांग रुग्ण यांच्याकडे पुरपरिस्थीतीत विशेष लक्ष देणार, तसेच आवश्यकता भासल्यास स्थलांतर करणार व साथरोग नियंत्रणासाठी कोल्हापूर जिल्हयातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज नागरिकांनी लाभ घ्यावा. – सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा, जि.प.कोल्हापूर

उपरोक्त विषयास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयामध्ये पुरपरिस्थीती करीता आपत्कालीन व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करणेत आले आहे.

 • जिल्हास्तरावर डॉ कुणाल खेमनार, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन कक्ष सुरु ठेवणेत आलेला असुन त्यामध्ये डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ यु जी कुभांर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी व जिल्हा मुख्यालयातील 25 कर्मचारी 24 तास नियंत्रण कक्ष सुरु केला हा कक्ष 1 जुन ते 2 ऑक्टोंबर 2017 अखेर कार्यरत राहणार.
 • तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विस्तार अधिकारी आरोग्य, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक / सेविका, बी एन ओ, यांचा समावेश असुन हा कक्ष 24 तास कार्यरत करणेत आलेला आहे.
 • प्राथमीक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आरोग्य सेवक / सेविका / सहायक यांच्यावरती जबाबदारी निश्चीत करणेत आलेल्या असुन त्यानुसार जिल्हास्तरावरुन सनियंत्रण करणेत येत आहे.
 • जिल्हयातील एकुण 129 पुरग्रस्त गावे व 210 जोखीमग्रस्त गावातील सर्वाना आपत्कालीन काळात औषधोपचार करणेबाबत पुर्ण नियोजन करणेत आले असुन त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
 • संभाव्य पुरग्रस्त गावासाठी एकुण 59 वैद्यकिय अधिकारी, 64 आरोग्य सहायक, 85 आरोग्य सेवक, 103 आरोग्य सेविका असे मिळुन 311 अधिकारी कर्मचारी यांना पुरग्रस्त गावासाठी आदेशीत करण्यात आले आहे. तसेच आद्यावत वाहन व औषधे इत्यादी वैद्यकिय पथकात सामावेश करण्यात आलेला आहे. व अशा तयार केलेल्या पथकांची माहिती कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी पदाधिकारी व संबधित कार्यालये यांना देण्यात आलेली आहे.
 • प्रत्येक प्रा.आ.केद्रे व उपकेद्र स्तरावर आवश्यक तो जलजन्य व किटकजन्य औषध साठा पुरेशा प्रमाणात पाठविणेत आलेला असुन शासनाच्या मार्गदर्शनक सुचनानुसार साथरोग नियंत्रण किट अद्यावत करणेत आले आहे. तसेच संभाव्य पुरपस्थिती उदभवल्यस जिल्हयातील संपर्क तुटणाऱ्या प्रा.आ.केंद्र अंगर्तत गावासाठी अतिरिक्त दोन ठिकाणी अतिरिक्त औषधसाठा ठेवण्यात आलेला आहे.
 • पुरग्रस्त भागातील तिव्र जोखीम गट  –
अ.क्रं. तालुका बाळंतपणाची अपेक्षित तारीख जोखीम बालके अतिगंभिर रुग्णाची संख्या अपंग, पॅरालेसे, दिर्घकाळ अंथरुनात असणारी
जुन जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकुण सॅम मॅम
1 भुदरगड 4 5 4 5 18 0 0 0
2  बावडा 3 6 2 3 14 0 0 0
3 पन्हाळा 18 20 17 12 67 0 3 0
4 शाहुवाडी 10 10 5 7 32 0 0 13
5 हातकणंगले 148 156 175 170 649 1 10 11
6 करवीर 45 104 116 112 377 4 3 7
7 कागल 44 34 30 46 154 2 14 112
8 शिरोळ 193 259 258 279 989 12 35 222
9 राधानगरी 18 21 14 17 70 0 0 6
कोल्हापूर 483 615 621 651 2370 19 65 371

वरील गटासाठी सर्व घटकांची वैद्यकिय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत नियमित तपासणी करण्यात येऊन आवश्यकता भासल्यास तात्काळ पुरग्रस्त गावाबाहेर सुरक्षित स्थळी हलवणे बाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.

 • पूरग्रस्त, संभाव्य पुरग्रस्त व संपर्क तुटणा-या गावंाना आरोग्य सेवक /सेविका,आरोग्य सहाय्यक/सहाय्यीका व वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत दैनंदिन भेट देवून साथीच्या रोगाचे रुग्ण निदर्शनास आलेस त्वरीत जागेवरच उपचार करणेत येणार आहेत. तसेच आरोग्य सेवक / सेविका व आरोग्य सहाय्यक / सहाय्यीका यांनी आपल्या भेटीत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीद्वारा नियमित शुध्दीकरण केले जाते किंवा नाही याची खातरजमा करुन रजिस्टरला नोदी घेवून संबधीत पाणी पुरवठा संस्थेला वस्तुनिष्ठ माहिती निदर्शनास आणून देऊन त्यावरील तंात्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
 • पुरग्रस्त गावासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर यांचेकडील फवारणी पथकाची फवारनीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी फवारणीची कारवाई करणेत येईल.
 • प्रत्येक वैद्यकिय पथकाकडे पुरेसा औषध साठा ठेवणेत येतो व ज्यात्या ग्रामपंचायतीकडे पुरेश्या प्रमाणात ब्लिचिंगपावडरचा साठा असलेची खात्री करणेत येते.
 • प्रा.आ.केंद्राचे कक्षेतील पुरग्रस्त गावात किंवा कोणत्याही साथीचा उद्रेक झालाच तर आपण प्रतिबंधात्मक उपचार युध्द पातळीवर करुन साथ आटोक्यात आनणेसाठी प्रयत्नशील राहणेत येते त्यासाठी आपल्या तालुक्यातील संपर्क अधिकारी व वैद्यकिय मदत पथक यांची जरुरीनुसार मदत घेणेसाठी संपर्क साधण्यात येतो.
 • पावसाळा सुरु होणेपुर्वी साथरोगाच्या दृष्टीने जोखमीच्या गावांना किमान महिन्यातुन एक भेट देवून परिस्थीतीचे अवलोकन वैद्यकिय अधिकारी यंाचे मार्फत करण्यात आलेले असुन योग्य पाठपुरावा करण्यात येत आहे.
 • प्राथमिक आरोग्य केद्रांचे वाहन यंत्रणा, साहित्य साधन सामुग्री सुसज्य ठेवणेत येते.
 • जिल्हयातील एकुण 34 ठिकाणी 108 आपत्कालीन आरोग्य सेवा पथक सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
 • याशिवाय बाहय जिल्हयातील सांगली, बेळगाव इ. आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क ठेवुन भौगोलीक परिस्थीतीनुसार रुग्णावर उपचार करणेत येणार आहेत.

याव्यतिरिक्त पुरपरिस्थीतीमध्ये ग्रामीण भागातील नागरीकांना अडचण आलेस जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडील दुरध्वनी क्रमांक 0231-2661653 तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.

श्री सर्जेराव पाटील,

उपाध्यक्ष

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ कुणाल खेमनार, (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

सौ.शौमिका महाडीक,

अध्यक्षा

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ प्रकाश पाटील,

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री चंद्रकांत वाघमारे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री सर्जेराव पाटील,

सभापती

बांधकाम व आरोग्य

जिल्हा परिषद कोल्हापूर

——————————————————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2018 >
June
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
अभ्यागत
visitors total