राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम (शासकीय योजना)

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम

वेगाने वाढणार्‍या लोकसंख्या नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात १९५२ पासून राबविणेत येत आहे. कुटूंबाचा  एकूण जीवनस्तर उंचावण्याच्या दृष्टीकोणातून माता व बालक या दोघांचे जीवीत खुप महत्वाचे असलेने लागोपाठ येणारी गरोदरपणे माता व बालक यांच्या पोषणावर विपरीत परिणाम करीत असतात. यासाठी, शासनाने खालील तात्पूरती, अधुनिक आणि कायमस्वरुपी संतती नियमनाच्या पध्दती / साधने जोडप्यांच्या आवडीनुसार उपलब्ध करुन दिलेली आहेत.

तात्पूरत्या संतती नियमनाच्या पध्दती

  1. तांबी पाळणा लांबविण्यासाठी तांबी हा संतती नियमनाचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे  आणि त्याचा वापर  दहावर्षापर्यत करता येतो. 
  1. प्रसुतीपश्चात तांबी प्रसुतीपश्चात तांबी प्रसुतीनंतर सुरक्षित व प्रभावी आहे.  प्रसुतीनंतर 48 तासाच्या आत बसविता येते.  
  1. गर्भनिरोधक गोळया   पाळणा लांबविण्यासाठी संतती नियमनाचा  परिणामकारक व सोपा मार्ग आहे.
  1. अंतरा अंतरा इंजेक्शन स्त्रियांनी घेतल्यास त्यांना तीन महिने गर्भधारणा टाळता येते. सलग गर्भधारणा प्रतिबंधासाठी दर तीन महिन्यांनी अंतरा इंजेक्शन घ्यावे लागते.
  1. छाया – छाया ही एक विनाहार्मोन तोंडावाटे घेण्याची गर्भधारणा प्रतिबंधक गोळी आहे. पहिले तीन महिने एक गोळी आठवडयातून 2 वेळा आणि नंतर चौथ्या महिन्यापासून प्रत्येक आठवडयात एक गोळी घ्यावी लागते. 
  1. निरोध निरोध हा पुरुषांनी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन असून ते लैंगिक संबधातून पसरणारे आजार आणि एचआयव्ही पासून दुहेरी संरक्षण देते. 
  1. ईपिल्स असुरक्षित लैंगिग संबधानंतर 72 तासाच्या आत नकोअसलेली गर्भधारणा टाळण्यासाठी ईपिल्स चा उपयोग केला जातो. 

वरील संतती नियमनाच्या सेवा जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत.

कायमस्वरुपी  संतती नियमनाच्या पध्दती

जिल्हयात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेलया प्रा आ केंद्राच्या ठिकाणी दरआठवडयाला टाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया  शिबिरांचे व निश्‍चित केलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाणी बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत योग्य लाभार्थीना प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातेा.