राष्ट्रीय आरोग्य अभियान

भारत सरकारने समाजातील गरीब, जोखमीच्या व दारीद्रय रेषेखालील लोकांना परिणाम कारक सेवा पुरविणेसाठी तसेच माता मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे व एकुण जनन दर कमी करणे यासाठी सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM-National Rural Health Mission) ची स्थापना केली आहे. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अभियान ची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य संबधित इतर कार्यक्रम यांच्या मधील समन्वय तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायीक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग घेऊन आरोग्याचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.

जिल्हयामध्ये राबविणेत येत असलेल्या योजना खालील प्रमाणे आहेत.

कुटूंब कल्याण कार्यक्रम आपल्या जिल्हयात परिणामकारकरीत्या राबविला जाण्यासाठी जिल्हा सोसायटीकडून जिल्हयातील कार्यरत असलेल्या प्रा.आ.केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, जि.प.दवाखाने व तालुका दवाखाने या आरोग्य संस्थांना त्यांच्या उदिदष्टाच्या प्रमाणात तसलमात देणेत येते.

शासकीय आरोग्य संस्थेसाठी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास सर्व लाभार्थ्यासाठी एकूण रु.१४५१/- लाभ देणेत येतो. स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया फक्त दारिद्रय रेषेखालील व अनु.जाती व जमातीमधील लाभार्थी साठी रु.६००/- रुपये व दारिद्रय रेषेवरील लाभार्थीसाठी रु.२५०/- लाभ दिला जातो.

जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये १ एप्रिल २००५ पासून सुरु आहे.
उद्दीष्ट –
जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील मुख्यत: चाळी, झोपडपटट्ी व गलीच्छ वस्ती इ. दारिद्रय रेषेखालील व अनु.जाती व अनु.जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु, अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे.

लाभार्थी पात्रता सदर योजनेचा लाभ अनु.जाती/जमाती व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना देय आहे.
लाभार्थी महिलेचे वय प्रसुती पुर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्ष असावे.
सदर योजनेचा लाभ दोन अपत्यापर्यंत देय राहील.

योजनेअंतर्गत मिळणारे लाभ जननी सुरक्षा योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचीत जाती जमाती मधील ग्रामीण भागातील गरोदर मातांना घरी प्रसुती झाल्यास रु.५००/- व आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास रु.७००/- इतका लाभ देण्यात येतो. शहरी भागातील लाभार्थ्यास प्रसुती झाल्यानंतर रु.६००/- चा लाभ देणेत येतो. या योजनेमध्ये मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात सिझर शस्त्रक्रिया झाल्यास रु.१५००/- चे अनुदान मान्यताप्राप्त खाजगी हॉस्पीटलला देय आहेत. जननी सुरक्षा योजने बाबत अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

मातामृत्यु व बालमृत्यु दर कमी करण्यासाठी माता व बालकांना वेळीच उपचार मिळणे ही बाब महत्वाची आहे. यास अनुसरुनच जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविणेत येत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे.

  • गरोदर माता नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळंतपणे या सर्व सेवा मोफत पुरविणे. यामध्ये प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या बाबींचाही समावेश आहे.
  • नवजात अर्भकांना ०-३० दिवसांपर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी व औषधोपचार या सेवा मोफत पुरविणे.
  • गरोदर मातांना बाळंतपणाच्या वेळी व अर्भकांना (०-३० दिवस) घरातून रुग्णालय, रुग्णालय ते रुग्णालय (संदर्भ सेवेसाठी) आणि रुग्णालय ते घर अशी वाहतूक सेवा मोफत पुरविणे.
  • गरोदर माता व अर्भक रुग्णालयात असेल त्या कालावधीसाठी आहारसेवा मोफत पुरविणे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये जननी शिशू सुरक्षा योजना अमंलबजावणी सुरु झाली असुन तपशिल खालील प्रमाणे आहे.
जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकीत्सक, सी.पी.आर.हॉस्पीटल, कोल्हापूर या ठिकाणी संदर्भ सेवा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी संपर्क न.(०२३१-२६४३४३४) व टोल फ्री नंबर १०२ हा आहे.

नियंत्रण कक्षामध्ये २ संगणक खरेदी करण्यात आले असनु इंटरनेट सुविधा सुरु करणेत आली आहे. तसचे इतर आवश्यक साधन सामुग्री खरेदी करुन नियंत्रण कक्ष अद्यावत करणेत आलेला आहे. नियंत्रण कक्षाच्या दर्शनी भागामध्ये संदर्भ सेवा नियंत्रण कक्ष असा बोर्ड लावणेत आलेला आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत एकुण ३ कॉल असिस्टंट पदांची नियुक्ती करणेत आली आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत जिल्हा आर.सी.एच. अधिकारी यांना जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले बाबत सुचना पत्र देणेत आले आहे तसेच प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग जि.प.कोल्हापूर यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केले बाबत पत्रा व्दारे सुचित करणेत आले आहे.

वैद्यकिय अधिक्षक उप.जि.रु/ग्रा.रु.यांना मा.जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या मार्फत शासन निर्णय व मागदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.

जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मिळाणा-या उपलब्ध सुविधांचे फलक आरोग्य संस्थामध्ये व सर्व रुग्णावाहिकांवर दुरध्वनी संपर्क नं.ठळक अक्षरात लावण्यास सुचित करणेत आले आहे.

रेफरल ट्रान्सपोर्ट व वाहन चालकांसाठी भ्रमण ध्वनीकरीता जिल्हा स्तरावरुन आर.सी.एच.अंतर्गत अनुदान वितरीत करणेत आलेले आहे.

उप.जि.रु/ग्रा.रु./प्रा.आ.केंद्रातील रुग्णवाहिका चालकांचे भ्रमण ध्वनी क्रमांक उपलब्ध करुन घेणेत आले आहेत. तसेच भ्रमण ध्वनी बंद न करणेबाबत व रुग्ण वाहिका अद्यावत करुन घेणेच्या सुचना देणेत आलेल्या आहेत.

पायाभुत सुविधा विकास कक्ष

एनआरएचएम अंतर्गत आरोग्य संस्थांची नवीन बांधकामे व दुरुस्तीसाठी प्राप्त निधीच्या नियोजनासाठी पायाभुत सुविधा विकास कक्ष १ सप्टेंबर २००७ पासुन स्थापन करणेत आलेला आहे.कक्षांतर्गत जिल्हास्तरावर एक उपअभियंता एक डाटा एन्ट्री ऑपरेटर कम् अकौंटंट व चार ब्लॉकसाठी एक याप्रमाणे तीन कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत.यांचेकडुन प्रा.आ.केंद्र व उपकेंद्राची नविन बांधकामे व दुरुस्तीची कामे करण्यात येतात व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचंी कामे सा.बा.विभागाकडुन करणेत येतात. सन २००७-०८ पासुन सन २०११-१२ पर्यंत घेण्यात आलेली नवीन बांधकामे व दुरुस्ती कामे खालीलप्रमाणे आहेत.

रुग्ण कल्याण समिती

जिल्हयातील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८ ग्रामीण रुगणालये, २ उप – जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयाचे ठिकाणी रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी सोई सुविधा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता या बाबींवर भर देण्यात येऊन संस्थेचे श्रेणीवर्धन करणेत येते .

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्राच्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष हे त्या प्रा.आ.केंद्राचे कार्यक्षेत्रातील पदसिध्द जि.प. सदस्य असतात. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाचे ठिकाणी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष हे त्या तालुक्यातील पदसिध्द आमदार असतात.

या समितीकडे खालील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेत आले आहे.

मोबाईल मेडिकल युनिट

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील आरोग्य सेवांपासून वंचित आणि अर्ध वंचित (Unserved & Underserved) क्षेत्रामध्ये वैद्यकिय सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत सन २०११-१२ मध्ये मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प राबविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हयामधून मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पाकरीता डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटल, कदमवाडी, कोल्हापूर यांची निवड करणेत आलेली आहे.

जे ठिकाण अति दुर्गम आहे व त्याठिकाणी वैद्यकिय सेवा पुरविल्या जात नाहीत अथवा पोहचत नाहीत त्या ठिाकणी मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प राबविणेकरीता जिल्हयातून १) पन्हाळा, २) शाहुवाडी व ३) गगनबाबडा या तीन तालुक्यांची निवड करणेत आलेली आहे. वरील तीन तालुक्यांमधून अति दुर्गम अशा ४१ गावंची निवड आरोग्य सेवा पुरविणे करीता करणेत आलेली आहे.

आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख प्रकल्प

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख तसेच लोकसहभागातून आरोग्य नियोजनाची (Community Based Monitoring & Planning of Health Services) संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यास अनुसरुन सन २०११-१२ मध्ये कोल्हापूर जिल्हयामधून आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख प्रकल्प अंतर्गत देखरेख व नियोजन समिती स्थापन करणेत येत आहे.

कोल्हापूर जिल्हयाकरीता आरोग्य सेवांवर देखरेख व नियोजन करणे करीता संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम संस्था) सांगली या संस्थेची जिल्हा समन्वयक संस्था म्हणून व सोशल असोशिएशन ऑफ नेटवर्क व्हॉलिटंरी ऍक्शन ऍण्ड डेव्हलपमेंट, म्हसवे, ता.भुदरगड या संस्थेची तालुका समन्वयक संस्था म्हणून निवड करणेत आली आहे.

ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सुविधंामध्ये सुधारणा करण्याबरोबरच परिसर स्वच्छता, पोषण, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या बाबींकडे लक्ष देणेत येते. यासाठी ग्राम स्तरावरील ग्राम आरोग्य समिती व ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती यंाचे विलीनीकरण करुन ग्राम स्तरावर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या जिल्हयामध्ये १२०६ महसुली गावनिहाय स्थापन करणेत आलेल्या आहेत.

२४ x ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे

अर्भक मृत्यू, मातामृत्यू व एकुण जननदर कमी करणे हे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी बरेच उपक्रम उपकेंद्रे व प्रा.आ.केंद्रे स्तरावरुन राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणुन २४ ÷ ७ प्रा.आ.केंद्र ही एक महत्वाची योजना आहे. यामध्ये आठवडयातील सातही दिवस व चोवीस तास बाळंतपण व नवजात अर्भक दक्षता इ. सेवा देणे येते. एकुण ७२ पैकी ४४ प्रा.आ.केंद्रे व ४१३ पैकी १६५ उपकेंद्रांची २४ x ७ योजने अंतर्गत निवड करणेत आलेली आहे.

आय.पी.एच.एस. (Indian Public Health Standard)

राज्यातील ग्रामीण जनतेस सहजसाध्य अशी परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांमध्ये रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा आय.पी.एच.एस. मानांकनापर्यंत दर्जा वाढविणे याचा समावेश करणेत आला आहे. आय.पी.एच.एस.चे मुख्य उदिदष्ट म्हणजे गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा लोकांच्या गरजा लक्षात घेवून पुरविणे हे आहे. या अंतर्गत सर्वकष सेवा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रा मार्फत दिल्या जाणे आणि दिल्या जाणा-या सेवा या निश्‍चित केलेल्या मानकाप्रमाणे असतील याची खात्री करणे अपेक्षित आहे.

आय.पी. एच.एस. अंतर्गत निवडणेत आलेले ग्रामीण रुग्णालय २०११-१२ : आजरा, चंदगड, नेसरी, काा बावडा, कोडोली, गांधीनगर, गडहिंग्लज, गारगोटी

आशा – मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व समाजातील अन्य महत्वपुर्ण घटक यांमध्ये सुसंवाद व समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्वपुर्ण दुवा आहे. आरोग्य संवर्धन, विविध प्रतिबंधक व उपचारात्मक उपाययोजना समाजामध्ये जाणीव व जागृती वृध्दींगत करणे, यामध्ये आशा स्वयंसेविकेची महत्वाची भुमिका आहे.

प्रत्येक गावातून १००० लोकसंख्येसाठी १ आशा स्वयंसेविकेची निवड केलेली आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये २७७३ इतक्या आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम

जिल्हयामध्ये ८ ऑगस्ट २००८ पासुन इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यां करिता शालेय आरोग्य तपासणी करणेसाठी शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम सुरु करणेत आला आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करुन त्यानां संदर्भ सेवा उपलब्ध करुण देणे बाबत पुढील कार्यवाही होत आहे.

तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकिय पथक स्थापन करणेत आलेली आहेत. सदर पथकामध्ये वैद्यकिय अधिकारी स्त्री व पुरुष व औषध निर्माता यांचा समावेश आहे. सदर पथकास फिरतीसाठी वाहने व औषधे उपलब्ध करुन देणेत आलेली आहेत.

  • इ.१ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे.
  • विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन करणे.
  • आरोग्य जाणीव जागृती करणे. पोषक आहाराबाबत मार्गदर्शन करणे.
  • वैयक्तीक स्वच्छते बाबत मार्गदर्शन करणे.
  • आरोग्य दोष शोधून त्यावर उपचार करणे.
  • विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे संदर्भसेवा शिबीराचे आयोजन करणे.
  • जिल्हा रुग्णालयात तसेच इतर मान्यता प्राप्त रुग्णालयात विद्यार्थ्यांची तपासणी व विविध गंभीर तसेच किरकोळ शस्त्रक्रिया मोफत करुन घेणे.
  • जिवनदायी योजनेतून शालेय विद्यार्थ्यांची -ह्दय शस्त्रक्रिया करुन घेणे.

ग्राम बाल विकास केंद्र व बाल विकास केंद्र

सहा वर्षाखालील मध्यम आणि गंभीर तीव्र कुपोषित ( मॅम व सॅम) (या मध्ये WHO मार्गदर्शक सुचनानुसार बालकाचे वय व वजन तसेच वय व उंची यंाचे तुलना करुन -2SD and 3SD यामध्ये वर्गीकरण करण्यात येते) बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मातांना बालसंगोपनासाठी सक्षम करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्र हे प्रभावी माध्यम आहे. ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) हे गांव पातळीवर प्रत्येक अंगणवाडी केंद्रात घेण्यात येईल आणि या केंद्राची प्रमुख अंगणवाडी सेविका असेल. या केंद्रात आहार व आरोग्य सेवा दिल्या जातील आणि मातांचे सक्षमीकरण करण्यात येईल.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बाल विकास केंद्रग्राम बाल विकास केंद्रात सुधारणा न झालेली तसेच सहा महिन्याखालील अति तीव्र कुपोषित बालकांना आणि गंभीर व दुर्धर आजारी बालकांना वरील प्राथमीक आरोग्य केंद्रावर बाल विकास केंद्रात सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील या बालकांच्या रोगनिदानासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या, तपासण्या (Path test / investigation ) संबंधित बाल रोगतज्ञांच्या सल्ल्याने करण्यात येतात.

ग्रामीण / जिल्हा रुग्णालय स्तरावर बाल विकास केंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील ज्या बालकांमध्ये २१ दिवसंामध्ये सुधारणा घडून येत नाहीत अथवा उपरोक्त कालावधील पुढील उपचारांची आवश्यकता असल्यास अशा बालकांना ग्रामीण / जिल्हा रुग्णालयातील बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येते.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत व प्रजनन व बाल आरोग्य टप्पा-२ मध्ये अर्श (Adolescent Reproductive & Sexual Helath) कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्श कार्यक्रमामध्ये १० ते १९ वर्ष वयोगटातील किशोर अवस्थेतील मुला-मुलींचा समावेश असुन त्यावर लक्ष कें्रदीत केलेले आहे. आज मितीस भारतात किशोर आवस्थेत मुला-मुलींचे प्रमाण २००१ च्या जनगणनेनुसार २२ कोटी ५ लाख असुन एकूण लोकसंखेच्या २२: इतके प्रमाण आहे. अशा या किशोर वयीन अवस्थेतील मुला-मुलींचा गट हा समाजा मधील एक अत्यंत संवेदनशील घटक असुन या गटाला आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक, आरोग्यदायी जीवनशैली अवलंब करण्याच्या दृष्टीने करावयाचे वर्तणूकीतील बदल प्रौगंडावस्थेतील (किशोरवयीन अवस्थेतील) विशेष आरोग्य विषयक व अन्य समस्या, भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल करण्याच्या दृष्टीने सर्वकष विकासाबाबत शास्त्रीयदृष्टया मार्गदर्शदं करण्यासाठी अर्श कार्यक्रमांतर्गत अर्श (मैत्री) क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत.अर्श कार्यक्रमाचा उद्देश:-

  • भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल सर्वकष विकासाबाबत मार्गदर्शन करणे.
  • आरोग्य विषयक सेवा निदान, उपचारदेणे.
  • सर्वागीण विकासाला पोषक वातावरण तयार करणे.
  • लग्नाचे वय प्रजनन व लैंगीक आरोग्य इतर समस्या संदर्भात जनजागृती करणे

अर्श (मैत्री) क्लिनीक अधिक माहीती

कुटूंब कल्याण कार्यक्रम

कुटूंब कल्याण कार्यक्रम आपल्या जिल्हयात परिणामकारकरीत्या राबविला जाण्यासाठी जिल्हा सोसायटीकडून जिल्हयातील कार्यरत असलेल्या प्रा.आ.केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, जि.प.दवाखाने व तालुका दवाखाने या आरोग्य संस्थांना त्यांच्या उदिदष्टाच्या प्रमाणात तसलमात देणेत येते.

शासकीय आरोग्य संस्थेसाठी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास सर्व लाभार्थ्यासाठी एकूण रु.१४५१/- लाभ देणेत येतो. स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया फक्त दारिद्रय रेषेखालील व अनु.जाती व जमातीमधील लाभार्थी साठी रु.६००/- रुपये व दारिद्रय रेषेवरील लाभार्थीसाठी रु.२५०/- लाभ दिला जातो.

कुटूंब कल्याण कार्यक्रम सन २०११-१२ मधील माहे जानेवारी २०१२ अखेर साध्य केलेले काम खालील प्रमाणे आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान २०१४-१५ मधील कामकाजाचा अहवाल