FaceBook Like

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

सर्व साधारण माहिती

क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजक्षय या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुप्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो.

क्षयरोग ही अजूनही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे. आपल्या देशात दररोज 1000 पेक्षा जास्त म्हणजेच दर तीन मिनिटाला दोन व्यक्तीचा मुत्यु क्षयरोगाने होतो. क्षयरोगामुळे होणार्‍या मुत्युचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विशेष: सामाजिक आणि आर्थिक हानी होते. सन 1962 पासून देशात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तथापि त्यामध्ये उपचारावर ठेवलेल्या रुग्णापैकी केवळ तीस ते चाळीस टक्के रुग्णांना बरे करण्याइतके मर्यादित यश मिळाले.

हे पाहता केंद्र शासनाने सान 1993 पासून काही निवडक ठिकाणी पथदर्शीतत्वावर प्रत्यक्ष निरीक्षणाखाली अल्पमुदतीच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरवात केली. पथदर्शी प्रकल्पाच्या उत्साहवर्धक कामगिरीवरून सन 1998 पासून केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रसार करण्यात ठरविले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्रा मध्ये सन 1998-99 पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. हा कार्यक्र्म राबविण्यासाठी राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी व ७८ जिल्हा/शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर आखणी राज्य व जिल्हा स्तरावर करण्यात आली. महाराष्ट्र ने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमअतर्गत सेवा देण्याच्या कामामध्ये झपाट्याने प्रगती केली आहे.

सध्या तील 100% लोकसंख्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअतर्गत प्रत्यक्ष निरीक्षणा खालील औषधोपचार मिळत आहेत. केंद्र शासनाने गठित केलेल्या मूल्यमापण समित्यांनी सर्व जिल्हा व महानगरपलिकाना सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअतर्गत सेवा देण्यापूर्वी भेटी दिलेल्या असून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी उच्च दर्जाची आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची खात्री केलेली आहे. आजमितिस 23 जिल्हे आणि 22 महानगरपलिकामध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे

उद्देष व उध्यिष्टे

उद्देष-क्षयरोग नियंत्रणाखाली आणणे. प्रती लाख लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी क्षयरोगचे प्रमाण (prevalence) आल्यास क्षयरोग नियंत्रणाखाली आला असे म्हणता येईल .सध्या:स्थितीत क्षयरोगचे प्रमाण ४ प्रती लाख लोकसंख्या असे आहे .

उउद्दिष्ट्ये – ९० % नवीन थुंकी दूषित क्षयरुग्णांना व 85% पुर्णउपचारावरील क्षयरुग्णांना बरे करणे आणि हा दर कायम राखणे .अपेक्षित नवीन थुंकी दूषित रुग्णांपैकी किमान ९० % थुंकी दूषित रूग्ण शोधणे आणि हा दर कायम राखणे

 1.    ड्रग रझीस्टंट क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविणे. (औषध प्रतिरोधक )
 2.      एचआयव्ही बाधित क्षयरुग्णांचे लागण व मृत्यू प्रमाण कमी करणे.
 3.      खाजगी क्षेत्रातील क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविणे.

अंमलबजावणी पद्धती  

 •     सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे पाच घटक
 •    राजकीय आणि प्रशासकीय बांधिलकी .
 •     मुलांची सुक्ष्म दर्शकाने रोग निदानाची योग्य व अचूक पद्धती .
 •       रुग्णानिहाय खोक्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या औषधांचा सातत्याने पुरवठा .
 •       प्रत्यक्ष निरीक्षणाखाली देण्यात येणारा औषधोपचार
 •      पद्धतशीर संनियंत्रण व बांधिलकी .

कार्यक्रमाचे घटक

१)प्रत्यक्ष निरीक्षणाखाली औषधोपचार

 •  चांगल्या दर्जाच्या औषधांचा रुग्ण निहाय बॉक्सद्वारे विना व्यत्यय पुरवठा
 • रूग्णाला सोयिस्कर अशा ठिकाणी व योग्य वेळेला प्रत्यक्ष निरीक्षणाखाली उपचार

 

२)अभिलेख आणि अहवाल

 •   शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची रुग्ण नोंदवही ,प्रयोगशाळा नोंदवही व औषधोपचार पत्रकावर नोंदणी
 •     उत्तम दर्जाची अभिलेख व अहवाल पद्धती – या अहवालामध्ये नवीन व पुनरुपचारांतर्गत रुग्ण ,थुंकी जिवानु मुक्त रूपांतरण ,उपचार फल निष्पत्ति व कार्यक्रम व्यवस्थापन या अहवालाचा समावेश असतो.

3)पर्यवेक्षन आणि संनियंत्रण

 •        सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक ,वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत पर्यवेक्षण
 •        जिल्हयाकडून आरोग्य संस्थानिहाय विश्लेषण व पाठपुरावाकडून जिल्हा निहाय विश्लेषण
 •        राज्यस्तरावरून जिल्ह्यांना भेटी

४) राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राची पुनर्बांधणी व सक्षमीकरण

५)कुठल्याही वेळी किमान 80 टक्के प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अवैद्यकीय कर्मचार्‍यांचे सातत्याने प्रशिक्षण

६) वैद्यकीय महाविद्यालये ,मोठी रुग्णालये,खाजगी वैद्यकीय व्यावसायिकरेल्वे व राज्य कामगार विमा योजना व अशासकीय सामाजिक संस्थांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहभाग

७) राज्यजिल्हा ,उपजिल्हा व गाव पातळीवरील माहिती आरोग्य शिक्षण व संवाद विषयक कामकाज

 •       गाव पातळीवरील राजकीय नेते ,अधिकारी इत्यादींचे जाणीव संवर्धन
 •     शक्य असेल तेथे सिनेमा स्लाईड केबल संदेश
 •     रुग्णांची सभा मेळावे ईत्यादी

देण्यात येणार्‍या सेवा

 •        मोफत क्षयरोग निदान व उपचार

क्षय रुग्णांची HIV तपासणी व उपचार

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपरोक्त सेवा 78 जिल्हा क्षयरोग केंद्रे,414 उपचार पथके,1444 निर्देशित सूक्ष्मदर्शी केंद्रे व 39329 प्रशिक्षित DOT प्रोव्हायडर मार्फत देण्यात येतात

टिबी एचआयव्ही समन्वय – त टीबी एचआयव्ही समन्वय कार्यक्रम राबविण्यात येतो.त्यामध्ये सर्व क्षयरुग्णाची विनामुल्य एचआयव्ही तपासणी करण्यात येते.एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना सीपीटी उपचार देण्यात येतो व त्यांना पुढील सेवा मिळण्यासाठी LINK केंद्राकडे (लिंक) केले जाते. सर्व .एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना एआरटी थेरपी देण्यात येते.एआरटी केंद्रासाठीच्या नवीन गाईडलाईन्स एप्रिल २०१०पासून अमलात आणल्या जात आहेत.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

 •        क्षय रोग सेवा देण्यासाठी आंतर राष्ट्रीय दर्जाची मानके राज्यभरातील उपचार पथके,डी एम सी येथे वापरात येतात
 •        थुंकी नमूना तपासणी साठी शासकिय तसेच खाजगी डी एम सी ना मान्यता
 •       औषधांची सहज उपलब्धता होण्यासाठी 2 की मी अंतराच्या च्या आत DOT CENTRE उपलब्ध
 •         DOTS उपचार मोफत देण्यात येतात
 •          टीबी एचआय व्ही चा संयुक्त आजाराचा ‍प्रतिबंध  प्रभावी होण्यासाठी राज्य,जिल्हा स्तरावर Mechanism
 •          सर्व समावेशक अहवाल सादरीकरण पद्धत
 •     कार्यक्रमाचा नियमित आढावा व मूल्यमापन

शीघ्र प्रतिसाद पथके (आर.आर.टी.)

साथरोग परिस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्‍यासाठी जिल्‍हा तसेच राज्‍य स्‍तरावर शीघ्र प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या पथकामध्‍ये साथरोग तज्ञसूक्ष्‍मजीवशास्‍ञज्ञकीटकशास्‍ञज्ञभिषक/ बालरोगतज्ञ यांचा समावेश आहे. जिल्‍हा पातळीवर झालेल्‍या प्रत्‍येक उद्रेकाचे अन्‍वेषण या पथकामार्फत केले जाते.

एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पात वापरल्‍या जाणा-या रुग्‍ण व्‍याख्‍या

सर्वेक्षण स्‍तरानुसार या कार्यक्रमात लक्षणांवरअनुमानांवर तसेचप्रयोगशाळा निदानावर आधारीत विविध व्‍याख्‍या वापरण्‍यात येतात.

मनुष्‍यबळ

या कार्यक्रमात राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावर सर्वेक्ष्‍ाण कक्ष कार्यरत आहेत. राज्‍य स्‍तरावर राज्‍य सर्वेक्ष्‍ाण अधिका-याच्‍या नेतृत्‍वाखाली सार्वजनिक आरोग्‍य विषयातील विशेष तज्ञाचे पथक कार्यरत आहेत. जिल्‍हास्‍तरावही जिल्‍हासर्वेक्षण अधिका-यासोबत जिल्हा साथरोग तज्ञ कार्यरत आहेत.

साथरोग उद्रेक २०१२

सन २०१२ मध्‍ये एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पांतर्गत पोर्टलवर एकुण ४३६ साथरोग उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.

आजार निहाय साथउद्रेक

या ४३६ साथरोग उद्रेकांपैकी सर्वाधिक १२७ उद्रेक डेंगी तापाचे असून त्‍या खालोखाल अतिसार व इतर तापाचे प्रत्‍येकी ८३ उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2019 >
March
SMTuWThFS
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31      
अभ्यागत
201,797