राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

योजनेची कार्यपध्‍दती

सहसंचालक,आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे हे राज्‍यस्‍तरावर कार्यक्रम प्रमुख आहेत व ते योजनेवर नियंत्रण ठेवतात. सहसंचालक, आरोग्‍य सेवा, (हिवताप,हत्‍तीरोग व जलजन्‍यरोग) पुणे-६ यांना सहाय्यक संचालक,आरोग्‍य सेवा (हत्‍तीरोग) पुणे व राज्‍य किटकशास्त्रज्ञ सहाय्य करतात. त्‍याचप्रमाणे प्रादेशिक स्‍तरावर सहाय्यक संचालक, आरोग्‍य सेवा,(हिवताप) व जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा हिवताप अधिकारी हे सहाय्य करतात.

अनुदान पध्‍दती

राज्य शासन आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्याकडून योजनेस अनुदान प्राप्त होते.केंद्रशासनाच्‍या मार्गदर्शक तत्‍वाच्‍या अधिन राहून राज्‍यामध्‍ये राबविण्‍यात येणा-या विविध हिवताप विरोधी उपाययोजना खालीलप्रमाणे.

(अ) सर्वेक्षण

 • नवीन हिवताप रुग्‍ण शोधण्‍यासाठी राज्‍यातील सर्व पाडा, वाडया, वस्‍ती,गावपातळीवर कर्मचा-यांमार्फत सर्वेक्षण.
 • आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
 • ” आशा ” स्‍वयंसेवक / पाडा स्‍वयंसेवकाचा स्‍थानिक स्‍तरावर किटकजन्‍य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग.

(ब) प्रयोगशाळा

 • जिल्‍हा व ग्रामीण रुग्‍णालय स्‍तरावरही प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्‍ध.
 • प्रत्‍येक प्रा.आ.केंद्राच्‍या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजूर
 • दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्‍या तात्‍काळ निदानासाठी रॅपिड डायग्‍नोस्टिक टेस्‍ट किटचा पुरवठा.
 • पी.फॅल्‍सीपफेरम या गंभीर स्‍वरुपाच्‍या हिवतापाचे शीघ्र निदान व उपचारासाठी ” आशा ” कार्यकर्तींना प्रशिक्षण.
 • डेंगी/ चिकुनगुनिया आजाराच्‍या निदानासाठी राज्‍यात २३ सेंटीनल सेंटर्स असून त्‍यापैकी ८ सेंटर्स नवीन स्‍थापन केली असून २०११ – १२ पासून कार्यान्वित करण्‍यात आली आहेत.

(क) डास नियंत्रणासाठी उपाययोजना

 • किटकनाशक फवारणी राज्‍यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्‍त गावांमध्‍ये सिंथेटीक प्रायरेथ्राईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्‍यात येते.
 • अळीनाशक फवारणी नागरी हिवताप योजने अंतर्गत राज्‍यातील निवडक १५ शहरांमध्‍ये (मुंबईसह) डासोत्‍पत्‍ती स्‍थानांवर टेमिफॉस, बी.टी.आय. या अळीनाशकाची फवारणी करण्‍यात येते. राज्‍यात नागरी हिवताप योजनेत समाविष्‍ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई. या योजनेत समावेश नसला तरी कोल्हापूरजिल्हामध्ये टेमिकॉस चा वापरनिमित पणे केला जातो.

जीवशास्त्रीय उपाययोजना  किटकनाशकामुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करुन राज्‍यामध्‍ये योग्‍य डासोत्‍पत्‍ती स्‍थानांमध्‍ये डास अळीभक्षक गप्‍पीमासे सोडण्‍यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येते.आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व घडामोडी
सॉफ्टवेअर्स
Calendar
< 2017 >
November
SMTuWThFS
   1234
 • All day
  2017.11.04

  गुरुनानक जयंतीच्या शुभेच्या!!!!!!….

567891011
121314
 • All day
  2017.11.14

  पंडित जवाहरलाल नेहरूंची आज जयंती. बालदिन म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो

15161718
19202122232425
262728
 • All day
  2017.11.28

  महात्मा जोतीबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० साली झाला..

2930  
अभ्यागत
visitors total