एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

 
ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

केंद्र शासन पुरस्‍कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला. मार्च २०१२ मध्‍ये या प्रकल्‍पासाठी असलेले जागतिक बॅकेचे अर्थ सहाय संपुष्‍टात आले असून सध्‍या हा प्रकल्‍प पुर्णपणे केंद्र शासन पुरस्‍कृत स्‍वरुपात सुरु आहे. राज्‍यात सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या सर्व रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थांचे एकञिकरण करणे हा या महत्वाकांक्षी प्रकल्‍पाचा प्रमुख उदेश आहे. अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करुन सर्व स्‍तरावरील माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान करणे तसेच स्‍थानिक स्‍तरापासून राज्‍य स्‍तरापर्यंत रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थेचे बळकटीकरण करुन रोग नियंञणाच्‍या उददिष्‍टास हातभार लावणे हा या प्रकल्‍पाचा आणखी एक महत्‍वपूर्ण हेतू आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचे मुख्‍यालय सहसंचालक आरोग्‍य सेवा पुणे १ येथे आहे.

प्रकल्‍पाची उद्दिष्‍टये

1.      ग्रामीण भागात रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍था अधिक बळकट करुन साथरोग उद्रेक वेळेत ओळखण्‍याची क्षमता विकसीत करणे आणि क्षेञिय पातळीवर साथरोग उद्रेक प्रतिबंध व नियंञणासाठी आवश्‍यक कृतीयोजना अंमलात आणणे.

2.      रोग निदानाची गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करणे तसेच अन्‍न व पाणी यांच्‍या गुणवत्‍तेचे नियमित संनियंञण करणे.

3.      प्रकल्‍पांतर्गत समाविष्‍ट रोगांची तपासणी व उपचार यात सुधारणा करणे.

4.      शहरी रोग सर्वेक्षण बळकटीकरण करणे.

5.      खाजगी वैद्यकीय व्‍यावसायिक, वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय संस्‍था तसेच जनतेच्‍या रोग सर्वेक्षणातील सहभागास चालना देणे.

6.      रोग सर्वेक्षण विषयक माहितीचे दळणवळण अधिक गतिमान व सुलभतेने होण्‍यासाठी गावपातळी पासून राज्‍य पातळीपर्यन्‍तच्‍या सर्व स्‍तरावर अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करणे.

7.      आरोग्‍य माहिती व जीवन विषयक आकडेवारी विषयी बळकटीकरण करुन रोग सर्वेक्षण मासिक प्रगती अहवालात ठळक सुधारणा घडवून आाणणे.

8.      रोग सर्वेक्षण कार्यक्रमाशी निगडीत सर्व विभागांशी समन्‍वय साधणे.

अंमलबजावणी पध्‍दती

Ø  वेबसाइट –www.ihip.nhp.gov.in/idspयाप्रणाली द्वारेदैनदीन माहिती घेणेत येते.

आय डी एस पी कार्यक्रम अंतर्गत सर्व्हेक्षण कार्यपध्दती-

१)एस फॉर्म(सिंडो्रमिक)- उपकेंद्र स्तरांवर काम करणार्‍या कर्मचार्‍या कडून नियमित गृहभेटीमध्ये आढळून येणार्‍या साथीच्या आजारा बाबत लक्षण समूहावर आधारित संकलन करुन दैनंदिन स्वरूपात,प्रा आ केंद्र व जिल्हास्तरांवर विहित नमुन्यांत (फॉर्म एस)पोर्टल वर  अहवाल सादर केला जातो.

२) पी फॉर्म (प्रिझम्प्टीव्ह)- प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,शासकिय दवाखाने या स्तरांवर काम करणार्‍या वैद्यकिय अधिकार्‍यानी आंतररुग्ण व बाहयरुग्ण विभागांत आढळून येणार्‍या साथीच्या आजारांच्या रुग्णांची तपासणी करुन (क्लिनिकल एक्झामिनेशन)विहित नमुन्यात  (फॉर्म पी)अहवाल दैनंदिन स्वरूपात पोर्टल वर अहवाल सादर केला जातो.

३) एल फॉर्म (लॅब कन्फर्मड)- प्रयोगशाळेमध्ये निश्‍चित निदान केलेल्या आजारा बाबत वर्गवारी दैनंदिन स्वरूपात पोर्टल वरविहित नमुन्यांत(फॉर्म एल) अहवाल सादर केला जातो.

Ø  IHIPIDSPप्रणालीद्वारे साथरोग आजाराचे रुग्ण फॉर्म एस(S) ,पी (P)व एल(L) अहवाल माहिती सर्व आरोग्य संस्था कडून  घेणेत येऊन ती प्रणाली द्वारे एकत्रित करनेत येते. विहित नमूना मध्ये माहिती दैनदीन स्वरूपात घेणेत येते .

Ø  वर्तमानपञात येणा-या साथरोग विषयक बातम्‍यांचाही पाठपुरावा करण्‍यात येतो(media scanning)

Ø  देशभरात कोठेही उदभवलेली आरोग्‍य विषयक असामान्‍य परिस्थिती कळविण्‍यासाठी १०७५ हा राष्‍ट्रीय पातळीवरील एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचा टोल फ्री क्रमांक आहे.

Ø  सर्व माहिती प्रणाली द्वारे राज्य व केंद्र शासनास पटविणेत येते

प्रयोगशाळांचे बळकटीकरण

या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांच्‍या प्रयोगशाळांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.साथरोग उद्रेकाच्‍या वेळी जिल्‍हयांना प्रयोगशाळा सुविधा पुरविणे हा या प्रयोगशाळांचा प्रमुख उद्देश आहे.

संदर्भ प्रयोगशाळांची जबाबदारी

Ø  सर्व जिल्‍हयांना प्रयोगशाळा सूविधा पुरविणे.

Ø  आयडीएसपी अंतर्गत प्रयोगशाळा सुविधांबाबत राज्‍य समन्‍वयकाशी नियमित संपर्कात रहाणे.

Ø  आयडीएसपी प्रयोगशाळा अहवाल ( एल फार्म) नियमितपणे पाठविणे.

Ø  प्रयोगशाळा निष्‍कर्ष हे त्‍वरीत राज्‍य सर्वेक्षण अधिकारी / जिल्‍हा सर्वेक्षण अधिकारी यांना वेळेत कळविणे.

टोल फ्री क्रमांक १०७५

हा टोल फ्री क्रमांक २४तास उपलब्‍ध असून देशातील सर्व ठिकाणाहून त्‍यावर फोन करता येतो. ही सुविधा फेब्रुवारी २००८ पासून सुरु करण्‍यात आली आहे. असामान्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण आढळल्‍यास अथवा रुग्ण संख्‍येत आकस्मिक वाढ झाल्‍यास खाजगी वैद्यकीय व्याववसायिकांनीही या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा , ही अपेक्षा आहे.

शीघ्र प्रतिसाद पथके (आर.आर.टी.)

राज्‍यातील साथरोग परिस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्‍यासाठी जिल्‍हा तसेच राज्‍य स्‍तरावर शीघ्र प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या पथकामध्‍ये जिल्हासर्व्हेक्षणअधिकारी ,जिल्हासाथरोगअधिकारी, जिल्हाहिवतापअधिकारी,साथरोग तज्ञ, सूक्ष्‍मजीवशास्‍ञज्ञ, कीटकशास्‍ञज्ञ, भिषक/ बालरोगतज्ञ, कनिष्ठवैज्ञानिकअधिकारी, पशू संवर्धन अधिकारी,सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनयांचा समावेश आहे. जिल्‍हा पातळीवर झालेल्‍या प्रत्‍येक उद्रेकाचे अन्‍वेषण या पथकामार्फत केले जाते.

मनुष्‍यबळ

या कार्यक्रमात राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावर सर्वेक्षण् कक्ष कार्यरत आहेत. राज्‍य स्‍तरावर राज्‍य सर्वेक्षण अधिकारी याच्‍या नेतृत्‍वाखाली सार्वजनिक आरोग्‍य विषयातील विशेष तज्ञाचे पथक कार्यरत आहेत. जिल्‍हास्‍तरावही जिल्‍हासर्वेक्षण अधिका-यासोबत जिल्हा साथरोग तज्ञ, डाटा मॅनेजर व डाटा ऑपरेटर कार्यरत आहेत.