यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 पुरस्कार वितरण कार्यक्रम,मुंबई *राज्यात जिल्हा परिषद कोल्हापूरचा व्दितीय क्रमांक *

यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 अंतर्गत पंचायत राज संस्थाचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ठ काम करणा-या कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्यामध्ये व्दितीय क्रमांकाचे रुपये 20 लक्षचा पुरस्कार आज दिनांक 12-03-2020 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय समोर, मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये वितरीत करणेत आला.महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते, मा. ग्रामविकास मंत्री नाम. श्री हसनसो मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली, मा. ग्रामविकास राज्यमंत्री नाम. श्री अब्दुल सत्तार, मा.पर्यावरण राज्य मंत्री श्री.संजय बनसोडे, मा.ग्राम विकास विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव श्री.अरविंदकुमार यांचे विशेष उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण करणेत आले जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्री बजरंग पाटील, जि.प.उपाध्यक्ष मा. श्री सतिश पाटील, जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती मा. श्री हंबीरराव पाटील, जि.प. शिक्षण व अर्थ सभापती मा. श्री प्रविण यादव, जि.प.समाजकल्याण सभापती मा. सौ स्वाती सासणे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती मा.डॉ. पदमाराणी पाटील , माजी जि.प. अध्यक्ष मा. सौ शौमिका महाडिक, माजी जि.प. उपाध्यक्ष मा. श्री सर्जेराव पाटील, मा.श्री.युवराज पाटील गटनेते, मा.श्री.सुभाष सातपुते जिल्हा परिषद सदस्य तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविकांत आडसुळ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र भालेराव यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार स्विकारला.

मा. नाम. श्री हसनसो मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी “सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी ग्रामिण जनतेशी निगडीत सर्व विकासाची कामे तळागळापर्यंत पोहचवावीत” असे उद् गार काढले.सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकिय कामकाज,सभा कामकाज,कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्ती वेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे इ. महिला व बालकल्याण विभाग,आरोग्य विभाग,जिल्हा पाणी व स्वच्छता,जिग्रावियं,कृषि,बांधकाम,ग्रामीण पाणी पुरवठा, समाजकल्याण, वित्त,ग्रामपंचायत,पशुसंवर्धन व शिक्षण या सर्व विभागाकडील कामकाजाचे तपासणी व पडताळणी मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे उत्कृष्ठ कामकाजाबाबत राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेस मिळाला आहे.तसेच जिल्हयातील गडहिंग्लज पंचायत समितीने विभागामध्ये व्दितीय क्रमांकाचे रु. 8 लक्षचा पुरस्कार पंचायत समितीचे मा. सभापती सौ रुपाली काबंळे, मा. उपसभापती श्रीम.श्रिया कोणकेरी, माजी सभापती श्री. विजयराव पाटील,माजी उपसभापती श्री. विद्याधर गुरबे, गट विकास अधिकारी मा. श्री शरद मगर व सहाय्यक गट विकास अधिकारी मा. आनंद गजगेश्वर यांनी पुरस्कार स्विकारला.
या कामी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नाम. श्री हसनसो मुश्रीफ, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा. नाम. श्री. सतेज उर्फ बंटी पाटील व आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री मा. नाम. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सहकार्य लाभले असून त्यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सर्व विषय समिती मा. सभापती, तत्कालीन पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद खातेप्रमुख व अधिकारी- कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेस हे यश प्राप्त झाले आहे असे मा. श्री.बजरंग पाटील अध्यक्ष,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांनी सांगून याबददल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
सही/-
(रविकांत आडसुळ)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र)
जिल्हा परिषद कोल्हापूर

 

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) रविवार दि.16 फेब्रुवारी, 2020 अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. 16 फेब्रुवारी, 2020 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसुचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

  • सदर अंतरिम उत्तरसुचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
  • सदर ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objections omInterium Answer Key या हेडींगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
  • त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 04/03/2020 ते दि. 13/03/2020 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • दि. 13/03/2020 नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
  • उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलदवारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसुची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरूस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

  • विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इ.) दुरूस्ती करण्यासाठी दि. 04/03/2020 ते 13/03/2020 रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्विकारले जाणार नाहीत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 

 

(श्रीम.आशाउबाळे)

                                                                शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                                जिल्हापरिषद,कोल्हापूर

 

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, ( चंबुखडी), शिंगणापूर, ता- करवीर कंत्राटी 1 (महिला) कबड्डी प्रशिक्षक भरती

कंत्राटी 1 (महिला) कबड्डी प्रशिक्षक

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला कंत्राटी सहाय्यक 1 खो-खो प्रशिक्षक (महिला) व 1 कुस्ती प्रशिक्षक (महिला) भरती

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, ( चंबुखडी), शिंगणापूर, ता- करवीर, जिल्हा – कोल्हापूर. कंत्राटी निवासी पुरुष रेक्टर भरती

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, ( चंबुखडी), शिंगणापूर, ता- करवीर, जिल्हा – कोल्हापूर. कंत्राटी निवासी पुरुष रेक्टर भरती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रुंगारवाडी तिसरी (संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा विभागस्तरीय निकाल जाहीर )

कोल्हापूर : ३०. ०१. २०२०

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८ -१९ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये पुणे विभागात ग्रामपंचायत श्रुंगारवाडी, ता. आजरा या ग्राम पंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. याबाबत ग्रामपंचायत श्रुंगारवाडी यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
या विभागस्तरीय स्पर्धेस पुणे विभागातील सर्व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीद्वारे तपासणी करणेत आली होती. आजरा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव असून सुद्धा स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये या गावाने केलेल्या भरीव कामगिरीमुळे श्रुंगारवाडी ग्रामपंचायतीस हे यश प्राप्त झाले आहे. श्रृंगारवाडी गावामध्ये 100 % कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध आहे. तसेच गावामध्ये भुयारी गटर्स असून हे गावं प्लास्टीक मुक्त असून गावातील प्लास्टीक कचरा ग्राम पंचायत स्तरावर संकलित करून तो विक्री केला जातो. या वैशिष्टयामुळे गावाला स्वच्छतेमधील पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या गावांला मा. श्री. बजरंग पाटील, अध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा.श्री. सतीश पाटील, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा. श्री. अमन मित्तल,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर तसेच सर्व सन्माननिय जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व मा. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले